नाशीक :- तामिळनाडू येथील तिरपूर, उडमलपेठ येथील पोल्ट्री मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असलेले महाराष्ट्रातील एकूण ३२ विद्यार्थी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे तामिळनाडू येथे अडकले होते. या विद्यार्थ्यांना आपल्या सुखरूप घरी परतण्याची राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून हे सर्व विद्यार्थी आपल्या घरी सुखरूप परतले आहे आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
तामिळनाडू येथील तिरपूर, उडमलपेठ येथील पोल्ट्री मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असलेले महाराष्ट्रातील एकूण ३२ विद्यार्थी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे तामिळनाडू अडकले होते. त्याना परत महाराष्ट्रात आपआपल्या घरी सुखरूप आणण्यासाठी ना.छगन भुजबळ यांनी केलेल्या सूचनेनुसार नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात येण्यासाठी आवश्यक परवानगी दिली होती. त्यानंतर खाजगी बसच्या माध्यमातून हे विद्यार्थी आज महाराष्ट्रात आणण्यात आले. तेथून त्यांना आपआपल्या घरी सुखरूप पोहचविण्यात आले. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
रोहित बच्छाव या विद्यार्थ्याने आपल्या भावना व्यक्त करत म्हटले की, तामिळनाडू येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील आम्हा सर्व ३२ विद्यार्थ्यांना सुखरूप घरी परतण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, छत्रपती खासदार उदयनराजे भोसले व पुणे येथील डॉ.नितीन कुलकर्णी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.