फलटण: मलठण येथील समाजिक सेवेचा वारसा असलेले श्री राजेंद्र निंबाळकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या मार्फत कोरोना सारख्या महाभयंकर आजारांमध्ये अनेक गोरगरीब कुटुंबांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. हाताला काम नाही ,रोजगार नाही, त्यामुळे पैशाची चणचण भासत आहे तसेच अन्न-धान्याचा व जीवनावश्यक गोष्टींचा सुद्धा तुटवडा भासत आहे. त्यामुळे समाजाच्या प्रति असणारी कळवळ श्री राजेंद्र निंबाळकर व त्याच्या सौभाग्यवती रोहीनी या उभयतांना स्वस्थ बसू देत नव्हती त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी समाजातील ५० कुटुंबांना पुरेल असा अन्नधान्याच्या किट त्यामध्ये सर्व जीवनावश्यक वस्तू सह देण्याचा निर्णय केला व त्याचं वाटप करण्यात आलं त्याबद्दल त्या कुटुंबीयच या मोलमजुरी गरीब कुटुंबियाकडून खूप आभार व्यक्त केले जात आहेत.