फलटण – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने (कलम १४४) संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. यामुळे रोज मोल मजुरी करून पोट भरणाऱ्या कष्टकरी लोकांना मोठे हाल सोसावे लागत आहेत, यावेळी सामाजिक बांधिलकी जपत आपले समाजाप्रती असलेले कर्तव्य म्हणून ग्रामपंचायत तिरकवाडीचे सदस्य मा. श्री. नानासाहेब अंकुश काळुखे व परिवार यांनी आपला मुलगा जय नानासाहेब काळुखे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तिरकवाडी गावातील 50 गरजू कुटुंबा ना जीवनावश्यक वस्तू व फेस मास्क चे वाटप करत सोशल डिस्टन्स चे नियम काटेकोरपणे पाळावेत अशी विनंती केली.