बारामती:वार्ताहर लॉकडाऊन च्या काळा मध्ये एमआयडीसी मधील मजुरांची उपासमार होऊ नये नये या साठी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता त्या खर्चातून मजुरांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे असे मत प्रसिद्ध व्याख्याते व पत्रकार अनिल सावळेपाटील यांनी केले.सोशल डिस्टनिग पाळून फक्त चार लोकात वाढदिवस साजरा करताना सावळेपाटील बोलत होते.या वेळी न्यू शिवक्रांती युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष हेमंत नवसारे, उद्योजक राहुल वायसे ,फेरेरो कंपनीचे अधिकारी महेश कोंडलीगे,आशीर्वाद ढाबा चे संचालक पप्पू राऊत आदी मान्यवर उपस्तीत होते.या वेळी 50 मजुरांना जीवनावश्यक वस्तू चे किट देण्यात आले. राष्ट्रवादी पुणे जिल्हा संघटक सचिव म्हणून सुभाष थोरवे काम करताना आलेले अनुभव कथन करून कोरोना दूर करण्यासाठी घ्यावयाची काळजी विषयी माहिती व शुभेच्छा अनिल सावळेपाटील यांनी दिल्या तर आभार गायक सलीम सय्यद यांनी दिल्या
फोटो सुभाष थोरवे यांना शुभेच्छा देताना अनिल सावळेपाटील (संग्रहित फोटो)