फलटण शहर व परिसरात पहिला करोना बाधीत आढळल्याने फलटणकर अधिक जागरुक*

फलटण : बिरदेवनगर (जाधववाडी) या फलटण शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात करोना बाधीत व्यक्ती आढळल्याने गेला सुमारे एक दीड महिन्यापासून करोना प्रादुर्भावापासून दूर राहिलेल्या फलटण शहर व परिसरातील लॉक डाऊन, संचार बंदी मागे घेतली जाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या जाधववाडी ग्रामपंचायत हद्दीतील बिरदेवनगर, फलटण नगर परिषद हद्दीतील संजीवराजेनगर, भडकमकरनगर हा भाग आजपासून कंटेंनमेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) आणि फलटण नगर परिषद उर्वरित भाग व कोळकी, ठाकुरकी ग्रामपंचायत क्षेत्र बफरझोन (राखीव किंवा तटस्थ क्षेत्र) म्हणून घोषीत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे प्रांताधिकारी तथा इंन्सीडन्ट कमांडर शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.
  प्रांताधिकारी कार्यालयात  फलटण शहर व परिसरात करोना बाधीत रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर नियम, निकष, निर्बंध अधिक कडक करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत असून त्या अनुषंगाने प्रांताधिकारी जगताप, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गटविकास अधिकारी अमिता गावडे, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप पोमण वगैरे अधिकारी, पत्रकार उपस्थित होते.
*आतापर्यंत आढळलेले २ बाधीत बाहेरगावाहुन आलेले, २ त्यांच्या संपर्कातील* 
           सातारा जिल्ह्यात कराड, सातारा, कोरेगाव, जावली, वाई तालुक्यात बाधीत करोना रुग्ण आढळल्याने संपूर्ण सातारा जिल्हा रेड झोनमध्ये असताना फलटण शहर व तालुक्यात विशेष खबरदारी घेण्यात आली, त्यामुळे येथे करोना पोहोचू शकला नाही, मात्र तरडगाव ता. फलटण येथील डॉक्टर युवती पुणे येथील वैद्यकीय शिबीरास उपस्थित होती त्यानंतर ती बाधीत झाली, या युवतीच्या कुटुंबातील एक वृद्ध महिला व लहान मूल बाधीत आढळल्याने तरडगाव व परिसरातील ६/७ गावे बफरझोन घोषीत करुन विशेष खबरदारी घेण्यात आली. दरम्यान वीज वितरण कंपनी पुणे येथे नोकरीस असलेला तरुण बाधीत आढळल्याने फलटण तालुक्यातील बाधीतांची संख्या ४ पर्यंत पोहोचली मात्र ४ पैकी केवळ २ रुग्ण येथील रहिवासी असून दोघे नोकरीनिमित्त बाहेर असल्याने त्याची दखल गांभीर्याने घेतली गेली नाही.
*तांबवे येथे नवीन बाधीत आढळल्याने 
भीतीचे वातावरण*
          तांबवे ता. फलटण येथील एक युवती द. कोरियामध्ये कार्यरत असून सुट्टीवर येथे आली असताना ती तांबवे व लोणंद येथे आपल्या कुटुंबियांसमवेत वास्तव्यास असताना कोरियन व्यवस्थेने सदर युवती व तिची कराड येथील एक सहकारी या दोघींना खास व्यवस्था करुन दि. २८ एप्रिल रोजी कोरियामध्ये पाचारण केले, येथून जाताना करोनाची कसलीही लक्षणे नसताना, तपासणीत निगेटिव्ह आढळलेली सदर युवती बाधीत असल्याचे तेथे निष्पन्न झाल्याने प्रशासनाने त्यांच्या कुटुंबासह संपर्कातील व्यक्तींना कोरोंटाइन केले मात्र त्यापैकी बहुतेकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निस्वास सोडला.
 *कोरोना बाधित रुग्णात 2 ने भर*
     आज तांबवे येथील कोरोना बाधित कुटुंबातील एक युवती बाधीत आढळल्याने तसेच उप जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून करोना बाधितांची कुटुंब व संपर्कातील लोकांना कोरोंटाइन केल्या ठिकाणी आरोग्य सेवा पुरविणाऱ्या पैकी एक परिचारिका बाधीत आढळल्याने फलटण येथील करोना बाधीतांच्या संख्येत आज २ ने भर पडली आहे.
     *करोना शहरालगत पोहोचल्याने भीती*
     आतापर्यंत फलटण शहर व तालुक्यात प्रत्यक्ष बाधीत आढळला नाही, तथापी आज लोणंद शहरात वास्तव्यास असणारी तांबवे ता. फलटण येथील युवती आणि आरोग्य सेवेतील जाधववाडी येथील रहिवासी परिचारिका बाधीत आढळल्याने काहीसे निर्धास्त असलेले फलटण शहर व तालुक्यातील सर्वसामान्य जनता धास्तावली आहे.
*कंटेंनमेंट व बफर झोनची घोषणा अपेक्षीत*
       दरम्यान प्रांताधिकारी तथा इन्सीडन्ट कमांडर शिवाजीराव जगताप यांनी शहरालगतच्या जाधववाडी ग्रामपंचायत हद्दीतील बिरदेवनगर आणि फलटण नगर परिषद हद्दीतील संजीवराजेनगर व भडकमकरनगर हा भाग कंटेंनमेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) व फलटण नगर परिषद उर्वरित क्षेत्र आणि कोळकी व ठाकुरकी ग्रामपंचायत क्षेत्र बफर झोन (तटस्थ क्षेत्र) म्हणून घोषीत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
*सोमवारी आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे नमुने घेतले होते*
      सोमवार दि. ४ मे रोजी उप जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या ६ डॉक्टर्स व परिचारिका यांचे घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले होते त्यापैकी एका परिचरिकेचा अहवाल पॉसीटिव्ह आला असून उर्वरित ५ जणांचे अहवाल निगेटिव्ह येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, मात्र अद्याप त्यांचे स्पष्ट अहवाल प्राप्त झाले नसल्याचे निदर्शनास असनुन देत त्याची खातरजमा करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.
*बाधीत परिचारिका सातारा येथे उर्वरित फलटण क्वारं टाइनमध्ये*
      बाधीत आढळलेल्या परिचरिकेस कोणतीही लक्षणे नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे मात्र त्यांना पुढील उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे पाठविण्यात आले आहे.  असे प्रांताधिकारी जगताप यांनी सांगितले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!