श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने देसाई इस्टेट मध्ये भाजीपाला घरपोच मोहीम शुभारंभ

बारामती:वार्ताहर शहरातील देसाई इस्टेट मधील  श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने निवडक स्वच्छ भाजीपाला घरोघरी देण्याचा शुभारंभ करण्यात आला.या प्रसंगी बारामती नगरपरिषद चे  नगरसेवक अतुल बालगुडे,जळोची ग्रामपंचायत चे माजी सरपंच छगन आटोळे,न्यू शिवक्रांती युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष शिवश्री हेंमत नवसारे, श्री गणेश तरुण मंडळ चे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते. मंडळाच्या वतीने 
लॉक डाऊन च्या काळात गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य व किराणा या पूर्वी देण्यात आला होता सोमवार दिनांक 4 मे रोजी प्रत्येक कुटूंबियांना आवश्यक असलेला निवडक,स्वच्छ भाजीपाला मोफत देण्यात आला. उन्हाळा व लॉकडाऊन ची ही वेळ असल्याने प्रत्येक कुटूंबियास भाजीपाला मिळताना अडचणी येत आहेत त्यांची दखल घेऊन सदर कार्यक्रम चे आयोजन केल्याचे श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो परंतु या लॉक डाऊन च्या काळात स्थानिक रहिवाश्यांना मदत करणे कर्तव्य असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
फोटो:देसाई इस्टेट मध्ये भाजीपाला वाटप करताना श्री गणेश तरुण मंडळ चे कार्यकर्ते
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!