भैरवगड

भैरवगड  -: महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक किल्ला म्हणजेच भैरवगड.

सातारा जिल्ह्यातील हा किल्ला सह्याद्रीच्या सलग रांगेपासून बाहेर आलेल्या डोंगराच्या फाट्यावर वसलेला आहे, त्यामुळे दुरून हा किल्ला दिसत नाही. घनदाट जंगल हे येथील मुख्य आकर्षण आहे. हे अरण्य अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आल्याने येथील सर्व गावांचे स्थलांतर करून ती अरण्याबाहेर वसवण्यात आली आहेत, त्यामुळे या भागात माणसांचा वावर तसा कमीच आहे. २०१२ साली भैरवगडाच्या आजूबाजूचे अभयारण्य “टायगर रिझर्व” घोषित केल्यामुळे हेळवाकहून भैरवगड, पाथरपुंज (व प्रचितगड) कडे जाणार्‍या कच्च्या रस्त्यावर जंगल खात्याने चौकी बसवलेली आहे व वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय या रस्त्याने जाता येत नाही.
 या गडावर पाहण्यासाठी खूप काही आहे
भैरवगडाच्या समोरच्या डोंगरावरील मंदिरात भैरी देवी, तुळाई देवी, व वाघजाई देवी यांच्या २ ते ३ फूट उंचीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात १०० जणांची झोपण्याची सोय होऊ शकते. मंदिरा समोरच्या प्रांगणात तुळशीवृंदावन व शंकराच्या पिंडीचा चबुतरा दिसतो. मंदिराच्या उजव्या बाजूला एका खडकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे.
या किल्या वरती भटकंती करायला गेलं असता पिण्याच्या पाण्याची सोय किल्ल्या वरती होते दक्षिणामुख दरवाजा असलेल्या टेकाडाला वळसा मारून गडाच्या मागील बाजूस गेल्यावर येथे पाण्याची दोन टाकी दिसतात. यातील पाणी पिण्यास उपयुक्त असून ते बारमाही असते. मंदिराकडे येणार्‍या कच्च्या रस्त्याने चालत जाऊन डावीकडे दरीत उतरणार्‍या वाटेने ५ मिनिटे खाली उतरल्यावर पाण्याचे एक टाके दिसते. मात्र हे पाणी मार्चपर्यंतच असते. मंदिराच्या मागच्या बाजूला कोकणातील पाते (गोवळ पाती) गावात उतरणारी वाट आहे. या वाटेने ५ मिनिटे खाली उतरल्यावर एक चौकोनी विहीर आहे. या विहिरीला बारमाही पाणी असते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!