कंटेनमेंट झोनमधील गावांना किरणा माल पुरविण्यास सुट

 

सातारा दि. 4 ( जि. मा. का ): सातारा या कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सातारा व जावली तालुक्यात क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीप्रमाणे पुढील ओदश होईपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेत किराणा मालाचा पुरवठा करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी प्राप्त असलेल्या अधिकारानुसार सातारा व जावली तालुक्यातील खालील गावांमध्ये अत्यावश्यक सेवेतील किराणा माल साहित्य घरपोच पुरविण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, सातारा ज्या प्रमाणे यंत्रणा उभारतील त्या प्रमाणे किरणा माल साहित्य घर पोच पुरविण्यात येतील.

सातारा नगर परिषद क्षेत्रासह ग्रामपंचायत क्षेत्रात किरणा साहित्य घपोच पुरविण्यास सुट

यामध्ये सातारा तालुक्यातील खेड, विलासपूर, गोडोली, शाहुपूरी, म्हसवे, सैदापूर, वाढे, कोडोली, संभाजीनगर, समर्थनगर व धनगरवाडी या ग्रामपंचायत क्षेत्रात व सातारा नगर पालिका क्षेत्र व त्रिशंकू क्षेत्र या संपूर्ण क्षेत्रात.

जावली तालुक्यातील 27 गावांसह  मेढा नगर पंचायत क्षेत्रात

किरणा साहित्य घपोच पुरविण्यास सुट

 जावली तालुक्यातील धनकवडी, निझरे, करंदी त. मेढा, मालचौंडी, सायळी, काळोशी, कसुंबी, गांजे, मोहाट, पिंपरी त मेढा, जवळवाडी, म्हाते खुर्द, म्हाते बु., वागदरे, गोंदेमाळ, गाळदेव, निपाणी मुरा, करंजे, चोरांबे, मामुर्डी, गवडी, आंबेघर त मेढा, आसणी, केळघर, नांदगणे, सांगवी ते मेढा, सावली ही गावे व मेढा नगर पंचायत क्षेत्रामध्ये उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, सातारा ज्या प्रमाणे यंत्रणा उभारतील त्या प्रमाणे किरणा माल साहित्य घर पोच पुरविण्यात येतील.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!