वाई पासून जवळ असलेल्या धोम धरणाच्या जलाशयात मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली आहे. या डोंगररांगेला दोन्ही बाजूने पाण्याने वेढा दिलेला आहे. बरोबर याच पाण्याच्या मधोमध कमळगड हा किल्लावदिमाखदार पणे उभा आहे.
या गडावर गेल्यानंतर आपल्याला अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत गडावर जाताना गड माथ्याच्या सपाटीवर प्रवेश होतो आणि आजूबाजूच्या डोंगरांचा सुंदर असा परिसर पाहायला मिळतो अनेक किल्ल्यांवर आपल्याला प्रवेशद्वार बुरुज असे काही बघायला मिळते पण या किल्ल्यावर असे काहीच बघायला मिळत नाहीत. गडावर गेल्यानंतर गडाच्या दक्षिणेकडे नैसर्गिक अशी भिंत तयार झाली आहे तिच्यावर बुरुजाचे थोडे फार बांधकाम झालेले पाहायला मिळते या गडावर इतर गडा गत कोठेही पाण्याचे टाके किंवा पाण्याची सोय नाही तसेच या किल्ल्यावरती काही ठिकाणी गवतात लपलेले चौथर्याचे अवशेष दिसतात. या गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग आपले लक्ष वेधून घेते त्याच डोंगररांगेला नवरानवरे चे डोंगर असे म्हणतात. पुढे गेल्यानंतर जमिनीत साधारण 30 ते 40 फूट लांबीचे खोल असे भुयार तयार झाल्याचे दिसते त्याला आत मधे उतरायला मजबूत पायर्याही आहेत यालाच गेरूची किंवा काव्याची विहीर असे म्हणतात या विहिरी मध्ये 50 ते 55 खोल पायऱ्या उतरत जाताना आपण डोंगराच्या पोटात जात असल्यासारखे वाटते याठिकाणी हवेतील थंडावा वाढत जातो या विहीरीच्या तळाशी पोहोचल्यानंतर आपल्याला लाल रंगाचे ओलसर माती पाहायला मिळते.
या गडावर जाण्यासाठी आपल्याला दोन वाटा पाहायला मिळतात एक म्हणजे महाबळेश्वरहून दुसरे म्हणजे वाईहून
१) महाबळेश्वर मार्गे –
महाबळेश्वरचा केट्स पॉइंट वरून खाली येणाऱ्या सोंडेवरून कृष्णा नदीच्या खोऱ्यात उतरलेखी सुमारे दोन तासात समोरच्या डोंगर उतारावरील नांदगणे गावात पोहोचता येते वस्तीच्या पाठीमागील पहाडावरून तसेच वर गेले की दोन अडीच तासात माणूस कमळगडावर पोहोचतो
वाई मार्गे :-
नांदगणे गावी येण्याचा सकाळी 9.30 वाजता एसटी बस आहे. किंवा आपण गाडी घेऊन गेलो तरी आपल्याला वाईवरून नांदगणे गावात जाता येते.
तसे त्या गडावर गेल्यानंतर या गडावर जास्त माणसांना राहण्याची सोय नाही या गडावरील एका मातीवर गोरखनाथ मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पाच ते सहा जन राहू शकतात.
सातारा जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे गड-किल्ले आहेत या सर्व किल्ल्यांना नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे तसेच या किल्ल्यान वरती पाहण्यासाठी तसेच नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येणारे खूप पर्यटक पाहायला मिळतात तसेच ट्रेकिंग साठी येणारे तरुणवर्ग आपल्याला पाहायला मिळत आहे.