दि.23.फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीने कोरोना विषाणू( कोविड 19) संसर्ग च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादित ‘हरभरा’ या शेतीमालाला हमीभाव मिळावा म्हणून मार्केट यार्ड ,फलटण येथे शासन खरेदी केंद्र सुरु केले आहे.सदरील हमीभाव केंद्राची माहिती समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी दिली.
केंद्र शासन दरवर्षी पिकपेरणी पूर्वी पंचवीस प्रकारच्या शेतमालाच्या किमान आधारभूत किमती जाहीर करत असते.मार्केट मधील शेतमालाचे दर किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी निघत असल्याचे लक्षात येताच फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीने नाफेड मार्फत तूर आणि हरभरा खरेदी केंद्र सुरु करणेची विनंती मा.जिल्हाधिकारी ,सातारा आणि महाराष्ट्र राज्य
को ऑप मार्केटिंग फेडरेशन यांचेकडे केली.जिल्हा मार्केटिंग अधिकारी सातारा आणि मार्केटिंग फेडरेशन यांनी सदरील उपक्रमास तात्काळ मान्यता दिलेची माहिती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
सध्या तूर खरेदी केंद्र बंद झाले असून हरभरा खरेदीसाठी मार्केट यार्ड येथे ऑनलाइन नोंदणी सुरु करणेत आली आहे.याकरिता सब एजंट म्हणून फलटण तालुका खरेदी विक्री संघ ची निवड करणेत आली आहे.हरभरा या शेतमालाचा हमीभाव रुपये 4875/- इतका असून कमाल आर्द्रता 12 % आवश्यक आहे.सन 2019-20 ची 7/12 वर हरभरा पिकाची ऑनलाइन नोंद असणे आवश्यक आहे.प्रति हेक्टरी 9.38 क्विंटल हरभरा खरेदी केला जाणार आहे.खरेदी केंद्रावर वाळलेला आणि स्वच्छ केलेला शेतमाल आणणे आवश्यक आहे.शेतकरी बंधूनी अधिक माहितीसाठी श्री एस .जी. देशमुख कनिष्ठ लिपीक (9860573727) आणि श्री.विठ्ठल जाधव ,व्यवस्थापक खरेदी विक्री संघ फलटण (9923338149) यांचेशी संपर्क करावा,अशी माहिती समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी दिली.
मार्केट यार्ड फलटण येथील शासन खरेदी केंद्रावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणून हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.