बारामती वृत्तसेवा :
बारामती नगर परिषदेत आरोग्य निरीक्षक काम करत असलेले राजेंद्र सोनवणे आपल्या एक महिन्याचा पगारातून चतुर्थश्रेणी सफाई कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाच्या या बिकट परिस्थितीमध्ये गटनेते सचिन सातव यांच्या हस्ते
जीवणावश्यक वस्तू व अन्नधान्य वाटप केले कोणत्याही प्रकारचा गवगवा न करता आपल्या विभागात काम करत असणाऱ्या व गरजवंत अशा महिला व पुरुषांना या दिलेल्या धान्यामुळे मोठा आधार मिळाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा खर्च टाळून 1 मे कामगार व महाराष्ट्र दीना निमित्त बारामती,रुई,जळोची येथिल सफाई कर्मचाऱ्यांना मदत केली ही मदत करत असताना सोनवणे यांनी आपला एक महिन्याच्या पगार कर्मचाऱ्यांना देऊन आज त्यांनी घासताला घास माझ्या कर्मचाऱ्याला मिळावा हा उद्देश असल्याचे सोनवणे यांनी सांगितले यावेळी गटनेते सचिन सातव,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भैया सातव,पत्रकार आनंद धोंगडे,तानाजी पथरकर,विशाल टाटीया,प्रशांत भागवत,अमोल यादव प्रस्तावना अनिल सावळे पाटील यांनी केली. सोशल डिस्टंटस पाळून सदर कार्यक्रम करण्यात आला. गहु, तांदूळ,१०० कामगारांना वाटप करण्यात आले या प्रसंगी युथविजिन ग्रुप च्या वतीने लॉकडाऊन मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचारी व ठेकेदाराचा सत्कार करण्यात आला.
फोटो ओळ: जीवनावश्यक वस्तू देताना राजेंद्र सोनवणे,सचिन सातव व इतर