बारामती वार्ताहर : नगरसेवक बिरजू मांढरे यांच्या वतीने
लॉकडाऊन च्या काळात गरजू ना जीवनावश्यक वस्तू दिल्या वर सुद्धा आर्थिक चणचण असल्याने स्वयंपाक बनविण्यासाठी (दळन दळणे, भाजी बनविणे साठी पैसे नसणे) अडचणी येत असल्याने तयार भोजन देण्याची व्यवस्था केली आहे जेवताना ताटा मध्ये चपाती,भाजी,मसाले भात असे पदार्थ देण्यात येत आहेत त्या ताटास ‘घड्याळ थाळी’ असे नामकरण करण्यात आले आहे. 1 मे कामगार दिन व महाराष्ट्र दिन चे औचित्य साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत परिसर,जळोची गावठान मधील रोज 400 नागरिकांना ही थाळी उपलब्ध करून देण्यात येत आहे.या वेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, नगरसेवक किरण गुजर,सुधीर पानसरे,अभिजित चव्हाण ,पोलीस कर्मचारी आदी मान्यवर उपस्तीत होते. नागरिकांना गहू,ज्वारी दिली तर दळण्यासाठी,भाजी दिली तर गॅस किंवा जळाऊ लाकूड आणनेसाठी पैसे नाही ही अडचण लक्षात घेऊन तयार भोजन सोशल डिस्टनिग पाळून लॉकडाउन उठे पर्यंत देणार असल्याचे नगरसेवक बिरजू मांढरे यांनी सांगितले.
फोटो ओळ.घड्याळ थाळी चा आस्वाद घेताना नागरिक व पाहणी करताना बिरजू मांढरे