बारामती वृत्तसेवा :
कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगाला विळखा घातलेला असतांना भारतात ही या विषाणूमुळे जवळपास एका महिन्यापेक्षा अधिक काळ पूर्ण देश संपूर्णतः लॉक डाऊन करण्याची ही कदाचित ही पहिलीच वेळ.अश्या परिस्थितीत महाराष्ट्र सरकार ही आपल्या सर्व ताकतीने उपाय योजना करून,प्रसंगी कठोर निर्णय घेऊन कोविड 19 च्या विरोधात लढत आहे. मुबलक आरोग्य सेवा व सुरक्षितता उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान महाराष्ट्र सरकारपुढे आहे.त्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे.आशा वेळी मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटना
ही महाराष्ट्र शासनाच्या व जनतेच्या मदतीला पुढे सरसावली आहे. संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने या बाबत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ( कोविड १९) सात लाख मदत देण्याचा निर्णय नुकताच घेतलेला असून व महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अधिपत्या खालील एसटी बँक संचालक मंडळाने देखील बँकेच्या वतीने पंधरा लाख मुख्यमंत्री सहाय्यता निधीस (कोविड १९) देण्याचे सरचिटणीस हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले. सध्या एसटी ची सेवा बंद आहे कामगारांचे मासिक वेतन वेळेवर होत नाही तरीही सामाजिक बांधिलकी जपत मदत करीत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.