इंदापूर तालुक्यातील भिगवनमध्ये आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

इंदापूर दि 28 :आजपर्यंत पुणे शहर व जिल्ह्याच्या आसपासच्या भागात कोरोनाने धुमाकूळ घातला असतानाच इंदापूरमध्ये एकही रुग्ण नसल्याने इंदापूरकरांना दिलासा मिळाला होता. तो दिलासा आज कोरोनाने हिसकावून घेतला. इंदापूर तालुक्यातील पहिला कोरोना रुग्ण भिगवण परिसरात आढळला.

आज भिगवण स्टेशन परिसरातील एका महिला रुग्णास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती येथे उपचारासाठी गेलेल्या या महिला रुग्णास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णास पुण्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याच्या घशातील द्रवाचे नमुने घेण्यात आले होते. तेथे तपासणी केल्यानंतर या रुग्णास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान शेजारच्या बारामती तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळला, मात्र इंदापूर तालुक्यात कोरोनाचा रुग्ण नसल्याने दिलासा होता. त्यातच आज (ता.२८) पर्यंत म्हणजे जवळपास १४ दिवस बारामती शहरात एकही कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण आढळला नसल्याने बारामती कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असतानाच आज इंदापूरमध्ये कोरोनाने खाते उघडल्याने आता पुन्हा चिंतेचे काहूर निर्माण झाले आहे.
Share a post

0 thoughts on “इंदापूर तालुक्यातील भिगवनमध्ये आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!