फलटण :- मिळालेल्या माहितीनुसार जिंती येथे एकाला दारू मिळाली नाही म्हणून दारू सारखे लिक्विड पिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जिंती येथे घडली तर याच गावातील दुसरा तरुणांचा मृत्यु अचानक उलट्या झाल्यानंतर उपचारादरम्यान झाला असून सदर प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिपक राघु जाधव वय 32 वर्षे हा शेत मजुरी करुन जिंती (पंचशीलनगर) ता फलटण येथे एकटाच राहत होता. दि 26 रोजी रात्री 8 :30 वाजण्याच्या सुमारास दिपक यास चक्कर येत असून डोळयावर अंधारी येत असल्याने दिपक यास गावातील दवाखाना बंद असल्याने फलटण येथील खाजगी दवाखान्यात त्याचे मामा मोटार सायकल वरून घेऊन जात असताना चौधरवाडी येथील रेल्वेरुळाजवळ थांबले असताना तेवढ्यात पाठीमागुन तेथे आलेल्या सागर याने भाऊ दिपक यास विचारले की , तुला अचानक काय झाले त्यानतर दिपकने सांगीतले की , मला दारु मिळाली नाही त्यामुळे दारु सारखे दिसणारे कोणतेतरी लिक्वीड पिले आहे असे सांगितल्यावर दिपक यास फलटण येथे खाजगी दवाखान्यात घेवुन आले यानंतर डॉक्टरांनी तपासुन एवढे घाबरण्यासारखे काही कारण नाही तुम्ही त्यास घरी घेवुन जावू शकता असे सांगीतलेने दिपक यास घरी घेवुन आले. दुस – या दिवशी पहाटे मामा शिवाजी मदने यांचा सागर यास फोन आला की दिपक यास उलट्या होत आहेत त्यास दवाखान्यात घेवून जायचे आहे तू ताबडतोब ये त्यानंतर सागर याने लगेच 108 नंबरवर फोन केला त्यावेळी दिपक यास भिंतीला टेकून बसविले होते नंतर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दिपक हा मयत झाला व त्यानंतर अॅम्बुलन्स आली यानंतर त्यांना दिपक हा मयत झालेचे समजल्यावर परत निघून गेली. सदर प्रकरणी मयत तरुण दिपक जाधव यांचा भाऊ सागर जाधव यांने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
दुसऱ्या प्रकरणात किरण सुरेश सावंत वय 30 वर्षे हा दि 26 रोजी दुपारी 2 वाचे मुमारास मी माश वर्षे या जिंती ता फलटण येथील घराशेजारील शेड मध्ये झोपला होता व तो तेथेच तो उलट्या करू लागला त्यानंतर तो बेशुध्द झाला यानंतर मोटार सायकलवरून त्यास फलटण येथे दवाखान्यात उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे औषधोपचार करण्यास घेवुन गेले . तेथील डॉक्टरांनी त्यास खाजगी दवाखान्यात फलटण येथे पुढील उपचारा करीता अॅडमिट केले तेथे त्याच्यावर औषधोपचार चालु असताना किरण हा दि 27 रोजी सायंकाळी 6 :30 वाजण्याच्या सुमारास मयत झाला. सदर प्रकरणी मधुकर सखाराम रणवरे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.