बारामती:वार्ताहर चीन मधील हुआण शहरातुन या आजाराची सुरुवात झाली. पाहता पाहता या आजाराने संपूर्ण जगाला म्हणजेच 150 पेक्षा जास्त देशांना आपल्या आवेशात घेतले. आज संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचे सावट निर्माण झालेले असताना आपला देश कसातरी झटपट करीत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करीत होता परंतु या कोरोना व्हायरस नावाच्या आजाराने भारतालाही विळखा घातला. पाहता पाहता संपूर्ण भारतात हा आजार पसरू लागला सरकारने संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केले. कोणालाही घरातून बाहेर पडण्याची मुभा नव्हती. फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू होत्या त्यातही महत्वाचे म्हणजे हॉस्पिटल, मेडिकल आणि किराणा दुकान एवढेच. लोकांचे सरकारी जॉब, प्रायव्हेट कपंन्या, मॉल, बाजारपेठा, इतकेच काय तर रोजगारावर आपले पोट भरणाऱ्या लोकांना ही घरातच बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. अशा लोकांनी पैसे रोजगरच नाही तर त्यांनी पैसेकोठून आणायचे आणि आपल्या पोटाचे खडगे कसे भरायचे हा खूप मोठा प्रश्न आपल्या देशापुढे आ वासून उभा होता. अशातच काही होतकरू संस्था माणुसकी म्हणा किंवा सामाजिक बांधिलकीतुन पुढे आल्या आणि त्यांनी आपल्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी उचलली. अशीच एक *श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ बारामती* म्हणून संस्था आहे त्यांनी आपला सेवाभाव दाखवून या कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यास खूप मोलाचे योगदान केले आहे. ही एक सामाजीक संस्था असून समाजातील वंचीत घटक, गो सेवा नैसर्गिक आपत्ती यासारख्या अनेक क्षेत्रात मोलाचे काम करीत आहे. या संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र मोदी यांनी संस्थेच्या सर्व सभासदांशी चर्चा करून या कोरोना व्हायरस सारख्या घातक महामारीला तोंड देण्याचे ठरवले. बारामती मधून जयेंद्र मोदी, पी. टी गांधी, रमणिक मोता, सचिन बोरा, दिलीप दोशी, मेहुल दोशी, सुमित बोराणा, निलेश मुथा, योगेश मुथा, नितीन भंडारी, तनय गुगळे, साहिल शहा, योगेश मुथा, अश्विन ओसवाल, पारमल ओसवाल यांनी कामला सुरुवात केली, त्यांनी त्यांच्या समाजातील लोकांना मदतीचे आवाहन केले आणि बघता बघता एका दिवसात 2,00,000/- (दोन लाख) रुपये निधी गोळा केला. या निधीतून ते बारामतीतील गरजू लोक बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून बारामती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अहिंसा भवन येथे रोज दुपार आणि संध्याकाळचे जेवणाचे डबे देण्यास सुरुवात केली. रोज अंदाजे 500 डबे दिले आहेत आणि आत्तापर्यंत अंदाजे 14,000+ डबे दिले आहेत तसेच लॉक डाऊनमुळे माणसाचे ज्याप्रकारे हाल चालू आहेत तसेच मुक्या प्राण्यांचेही चालू आहे या सजीव सृष्टीत त्यांनाही आपल्यासारखाच जगण्याचा हक्क आहे या भावनेतून या संस्थेने रोज मुक्या प्राण्यांना (मांजर, भटकी कुत्रे, गाय) पोट भरेल असा आहार देत आहेत. या संस्थेने कुठल्याही प्रकारची जाहिरात केली नाही, तसेच सोशल डिस्टन्स पाळून, बारामती नगरपालिका तसेच तहसील कचेरी फक्त यांनाच या योजनेची माहिती दिली होती आणि व्हाट्सअप्प वर मेसेज पाठवला या संस्थेचे हे काम पाहून बारामती मधील बरेच उद्योजक आणि होतकरू तरुण तसेच बारामती अर्बन बँक आणि बारामती मधील वकील संघटना यांनी देखील या संस्थेशी संपर्क साधून संस्थेला मदत केली आहे. या संस्थेचे हे काम पाहून समाजातील इतर घटकांनीही विचार करण्याची गरज आहे. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्यांनीही पुढे आले पाहिजे. श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ यां संस्थेनी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी संपूर्ण भारतातून जैन समाजाने अंदाजे अडीजशे कोटी रुपये निधी म्हणून गोळा केलेला आहे. दिनांक 28 मार्च 2020 ते 23 एप्रिल 2020 पर्यंत रोज दोन वेळचे डबे गरजू लोकांना देत होते परंतु दिनांक 24 व 25 एप्रिल 2020 रोजी केंद्रीय कमिटी बारामती येथे सर्व्हेक्षण करण्या करीता आली होती. या दोन दिवशी कडक बंदोबस्त होता त्यामुळे डबे देण्याची सोय आम्ही तात्पुरती बंद ठेवली होती. जोपर्यंत कोरोना व्हायरस पूर्णपणे नामशेष होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवू तसेच जनतेने विनाकारण घरातुन बाहेर फिरू नये. सरकारच्या वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे पालन करून सरकारला सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष श्री पी. टी गांधी यांनी केले