बारामती: वार्ताहर लॉकडाऊन च्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी,जनजागृती साठी,अफवा फसरू नये आणि प्रशासनास सहकार्य होणे साठी स्थानिक स्वयंसेवक म्हतपूर्ण भाग असल्याचे बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले.
देसाई इस्टेट येथील अक्षय आनंद कम्युनिटी सेंटर येथे “स्वयंसेवकांचे कार्य ” या विषयी मार्गदर्शन व टी शर्ट स्वयंसेवकाना वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी औदुंबर पाटील बोलत होते .या प्रसंगी बारामती शहर राष्ट्रवादी युवक चे कार्याध्यक्ष विशाल जाधव, उद्योजक मिलिंद वाघोलीकर, निलेश महाडिक,डॉ रामदास गाडे,सचिन मोरे,प्रवीण बोरा,रवींद्र पांडकर,सुरेश झगडे,विशाल आगवणे,सत्यजित काटकर,राजेंद्र भंडारे आदी मान्यवर उपस्तीत होते.स्वागत व आभार राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष विशाल जाधव यांनी मानले.