फलटण :- अल्पवयीन मुलीस गावातील एका मुलाने फुस लावून पळवून नेहल्या प्रकरणी मुलाच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार, कुरवली बु ता . फलटण येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी दि 19 रोजी रात्री 1:00 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात ज्या ठिकाणी झोपली होती त्या ठिकाणी घरातील व्यक्तींना दिसली नाही म्हणुन मुलीच्या आई व वडिलांनी घराचे आसपास व वस्तीवर तीचा शोध घेतला परंतु ती मिळुन आली नाही . त्यानंतर ईतर नातेवाईक यांचेकडे फोन करून मुलीची चौकशी केली परंतु तीचे बाबत माहीती मिळुन आली नाही . दि .22 रोजी फिर्यादी मुलीचे वडील यांच्या चुलत भाऊ यांचे मोबाईलवर व्हॉटसअपवरती अल्पवयीन मुलगी व त्याचं गावातील एक मुलगा या दोघांचा एकत्रीत फोटो आला होता त्यामुळे अल्पवयीन मुलीच्या वडिलांची खात्री झाली की , अल्पवयीन मुलगी ही अल्पवयीन असताना गावातील मुलाने तिला कशाचेतरी अमिष दाखवुन तीला पळवून नेहले आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.