राहूल पवार आसू वार्ताहार- दि.१९ फलटण पूर्व भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले असून या मध्ये शेतकऱ्यांचे तसेच सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे.
रविवारी रात्री फलटण तालुक्यातील आसू,पवारवाडी, गोखळी, खटकेवस्ती,गवळीनगर,साठे,राजाळे या भागामध्ये पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठीच धांदल उडाली. तसेच या मध्ये शेतकऱ्याचे जनावरांच्या चारा पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच आसू येथील पोपट रामचंद्र घाडगे यांच्या घरावरील पत्रा उडून जाऊन मोठे नुकसान झाले आहे .
पोपट रामचंद्र घाडगे हे आसू – तावसी रोड लगत असलेल्या शेतात राहतात. काल रात्री पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली असता या वादळी वाऱ्याने घरावरील पत्रा वाऱ्याने उडून गेला व या मध्ये त्यांच्या घराचे व घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच बरोबर आसू तसेच परिसरातील मोठमोठाले वृक्ष पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.