वादळी वारे व अवकाळी पावसाने एमआयडीसी परिसरात नुकसान

 

बारामती: बारामती एमआयडीसी परिसरात (रविवार 19 एप्रिल)  रात्री आठच्या सुमारास प्रचंड वेगाने  वाऱ्यासह  अवकाळी पाऊस झाला त्यामुळे या परिसरामध्ये प्रचंड नुकसान झाले. अनेक कंपन्यांचे पत्र्याचे शेड,माल ठेवण्यासाठी  तात्पुरता केलेला आसरा,जीवनाशवयक वस्तू ठेवण्या साठी तयार केलेले कोरोगेटेड बॉक्स,दुचाकी,जीवनावश्यक वस्तू,कामगार व मजूर वसाहत  आदी चे प्रचंड नुकसान झाले.
 एमआयडीसी  परिसरातील वादळी वाऱ्याने  विजेचे खांब पडलेले असून  त्यामुळे रात्रभर वीज  एमायडिसी परिसरामध्ये नव्हती.
 कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर अनेक अत्यावश्यक वस्तू तयार करण्यासाठी  कंपन्यांना प्रशासनाने उत्पादन तयार करण्यास सांगितले होते त्या सर्व मालाचे नुकसान झालेले आहे. परप्रांतीय मजूर यांच्यासाठी बांधलेले तात्पुरता निवारा शेड सुद्धा उडून केले व नुकसान झाले आहे.
एमआयडीसी परिसरातील कटफळ, वंजारवाडी, रुई साबळेवाडी, गाडीखेल , जळोची आधी परिसरामध्ये सुद्धा मका, बाजरी कडवळ,गहू आदी पिके व शेडनेट भुईसपाट झालेले आहेत
वादळी वारे व अवकाळी पावसाने झालेले उद्योजक व शेतकऱ्यांचे नुकसान यांची प्रशासनाने पाहणी  करून पंचनाने करावेत व नुकसानभरपाई द्यावी कारण कोरोना मुळे  लॉक डाऊन असताना झालेले नुकसान व हे आता दुसरे नुकसान असल्याने या परिसरातील उद्योजक,कंपनी व शेतकरी यांनी नुकसानभरपाई ची मागणी केली आहे.शासनाने त्वरित नुकसान भरपाई करण्यासाठी पथक नेमून सहकार्य करावे अशी मागणी बारामती चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व विविध उद्योजक संघटनांनी  शासनाकडे केली आहे .कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वेळ न दवडता प्रशासनाने पंचनामे करून  नुकसानभरपाई दिल्यास उद्योजकांना संजविनी मिळेल असा आशावाद गोपाला क्राफ्ट चे मॅनेजर सोमेश शर्मा यांनी व्यक्त केला.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!