*फलटण शहरातील नागरिकांना आता विनाकारण बाहेर फिरता येणार नाही*

*जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला चार दिवसातून फक्त एकदाच बाहेर पडता येणार*
*फलटण* : आपल्या तालुक्यात *कोरोना* या संसर्गजन्य आजाराची लागण झालेला रुग्ण नुकताच *तरडगांव* येथे आढळून आलेला आहे.
           त्या रुग्णाच्या संपर्कामध्ये आलेल्या संबंधितांना *क्वाऺरटाईन* करण्यात आले आहे. या संसर्गाची लागण आपल्या तालुक्यामध्ये जास्त होवू नये या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांची नुकतीच एक मिटिंग आयोजित करण्यात आली होती. 
           या मिटींगला फलटणचे उपविभागीय अधिकारी *मा.श्री.शिवाजीराव जगताप*, उपविभागीय पोलिस अधिकारी *मा.श्री.तानाजी बर्डे*, प्रभारी तहसीलदार *मा.श्री.आर.सी.पाटील*, गटविकास अधिकारी *मा.अमिता गावडे*, फलटण नगरपरिषद मुख्याधिकारी *मा.श्री.प्रसाद काटकर*, पोलीस निरीक्षक *मा.श्री.प्रताप पोमन* इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
               सदरच्या मिटिंगमध्ये फलटण शहरात व तालुक्यात लागु करण्यात आलेल्या *संचार बंदीची* कडक अंमल बजावणी करण्याचे ठरले.
                 यावेळी फलटण नगरपरिषद मुख्याधिकारी *मा.श्री.प्रसाद काटकर* यांनी फलटण शहरातील सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आता घरातील फक्त एका व्यक्तीलाच चार दिवसातून फक्त एकदा बाहेर पडता येईल, यासाठी फलटण नगरपरिषदेने चार वेगवेगळ्या रंगाचे पासेस तयार केले असून त्या पासेसचे वाटप फलटण शहरातील सर्व कुटुंबांना *रविवार दिनांक १९ व सोमवार दिनांक २० रोजी करण्यात येईल. या नियमाची अंमलबजावणी मंगळवार दिनांक २१ तारखेपासून* प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे *मा.श्री.प्रसाद काटकर* यांनी म्हटले आहे. 
       त्या व्यक्तीने नेमून दिलेल्या तारखेलाच घराच्या बाहेर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडावयाचे आहे, सोबत नगरपालिकेने दिलेला पास त्याच्याकडे असणे गरजेचे असून या व्यतिरिक्त कोणीही शहरांमध्ये विनाकारण फिरत असताना आढळून आल्यास त्याच्यावर *फौजदारी गुन्हा* दाखल करण्यात येणार असल्याचेही या मिटिंगमध्ये ठरले आहे. याकामी फलटण शहरातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की, *आपण घरातच रहा…सुरक्षित रहा…* विनाकारण रस्त्यावर अथवा गल्ली बोळा मध्ये एकत्र येऊन बसू नका. 
आपली व आपल्या घरातील सर्वांचीच काळजी घेऊन *मीच माझा व माझ्या कुटुंबाचा रक्षक* या नात्याने वागावे अशी विनंतीही *मा.श्री प्रसाद काटकर* यांनी केली आहे.
*टिप : सोबत पासेसचा रंग व नमुना पाठवित आहे*.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!