आसु (आनंदा पवार): महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी चे औचित्य साधून आसु येथिल आदिवासी कातकरी ऊसतोड मजूर व ज्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकटझालेल्या कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आली…
आसू तालुका फलटण येथे बौद्ध विहारात सकाळी मंडळाच्या चारच सदस्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर बुद्धवाड्यातील नागरिकांनी त्रिशरण पंचशील बुद्ध पूजा भीम स्तुतीभीम भीमस्मरण ग्रहण करण्यात आले…
जयंतीचे औचितय साधून समाजातील सर्वांनी आर्थिक भरघोस मदत केली त्यातून गरजूंना पाच किलो गहू, तांदूळ, तेल, डाळ, साबण, साखर, चहा, शेंगदाणे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले