आसू- (वार्ताहर : अजित निकम ):करोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या व ऊस तोडणी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या गोष्टीचा विचार करत मठाचीवाडी येथील रेशन दुकानदार शिवाजीराव बाजीराव भोसले यांनी मठाचीवाडी याठिकाणी असलेल्या ऊस तोडणी मजुरांना रोख स्वरूपात तसेच स्वतःच्या घरात भेटणारे रेशन त्या मजुरांसाठी उपलब्ध करून दिले व त्यांना परिस्थितीवर मात करण्यासाठी आधार दिला आहे.
तसेच ऊस तोडणी मजुरांची सरकारने दखल घेऊन तसेच साखर कारखान्यांनी आपल्या ऊस तोडणी मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून मदतीचा हात पुढे केला आहे.
फलटण तालुक्यामध्ये कारखानदारी व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात ऊस तोडणी मजूर येऊन ऊस तोडणीचे काम करत असतात. कारखाना बंद झाल्या नंतर ते आपल्या गावी जात असत पण जिल्हा बंदी झाल्याने त्यांना त्याच ठिकाणी राहावे लागत आहे.