फलटण : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हॅण्ड सॅनिटायझरची वाढती गरज लक्षात घेऊन श्रीराम सहकारी साखर कारखाना संचलित अर्कशाळेमध्ये दररोज सुमारे २००० हजार लिटर सॅनिटायझर उत्पादनास सुरुवात झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क खात्याचे प्रभारी उपअधीक्षक मा.श्री.एल एम.शिंदे व कारखान्याचे कार्यकारी संचालक मा.श्री.तळेकर यांच्या शुभहस्ते उत्पादन शुभारंभ करण्यात आला.
श्रीराम सहकारी साखर कारखाना नीरा व्हॅलि डीस्टीलरी विभाग लीजधारक मे.वाळवेकर ब्रदर्स आणि कंपनी, पुणे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानपरिषद सभापती मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), मा.आ.दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर(बाबा) यांचे मार्गदर्शनाखाली सॅनिटायझर उत्पादन सुरु करण्यात आले आहे. श्रीरामचे चेअरमन मा.डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा.चेअरमन मा.श्री.नितीन भोसले व संचालक मंडळ आणि मे.वाळवेकर ब्रदर्स आणि कंपनीचे मा.श्री.किरण वाळवेकर व मा.श्री.मनोज वाळवेकर यांच्या विशेष प्रयत्नाने सदर सॅनिटायझर उत्पादन सुरु झाले आहे.
उत्पादन शुभारंभ प्रसंगी डीस्टीलरी मॅनेजर मा.श्री.अशोक वरे, मे.वाळवेकर ब्रदर्स आणि कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर मा.श्री.दत्तात्रय कोल्हे, प्रॉडक्शन मॅनेजर मा.श्री.दिलीपराव बर्गे, मद्य विभाग प्रमुख मा.श्री.शिवराज कदम, इंजिनिअर मा.श्री.राजेश परकाळे, राज्य उत्पादन शुल्क खाते आणि अर्कशाळा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.