फलटण : कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मुळे गोरगरीब आणि रोजंदारीत काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत सद्गुरु व महाराजा उद्योग समूह फलटण यांच्या वतीने फलटण येथील प्रभाग क्रमांक- ११ मधील पाचशे गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वितरण करून मदतीचा हात दिला आहे.
सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली,स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा व नगरसेविका अँड. सौ. मधुबाला भोसले यांच्या सहकार्याने प्रभाग 11 मधील गरजूंना गव्हाचे पीठ,अंडी तांदूळ ,साखर, कडधान्य, साबण इत्यादी साहित्यांचा समावेश असलेले जीवनावश्यक वस्तूंचे कीट श्री.सद्गुरू पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले,महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजीतसिंह भोसले ,पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजाराम फणसे सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे सी.ई .ओ.संदीप जगताप, संचालक गिरीष फणसे, अमोल सस्ते यांचे हस्ते वाटप करण्यात आले .
या मदतीमूळे नागरिकांच्यात समाधान दिसून आले.या वेळी मास्क लावून,सोशल डीस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.प्रत्येकाने घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे,शासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन दिलीपसिंह भोसले यांनी केले.