शेतकरी ते ग्राहक या थेट विक्री योजनेस सोशल मीडियावर शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

फलटण दि-फरांदवाडी कृषीक्रांती शेतकरी प्रोड्युसर कंपनी तर्फे शेतकरी ते ग्राहक या थेट विक्री योजनेस सोशल मीडियावर शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
       कोरोना विषाणू प्रार्दूभावाच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी लागू असल्याने  मध्यस्थांची साखळी तोडून शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीची संकल्पना या हॉटसपग्रुप च्या माध्यमातून   फरांदवाडी कृषी क्रांती शेतकरी प्रोड्युसर कंपनी च्या वतीने कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे 
कमीतकमी हाताळणी(Zero Handeling) झालेली फळे ,भाजीपाला ,कडधान्ये,तृणधान्य, दुग्धजन्य पदार्थ व इतर शेतमाल उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्याचे मालाचे पत्ता माहितीसह फोटो व संपर्क क्रमांक  यांना व्यापक प्रमाणात प्रसिद्धी दिल्यामुळे शेतकरी ते ग्राहक या माध्यमातून मोठया प्रमाणावर शेतीमाल विक्री झालेली आहे  यास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून शेतकरी व ग्राहकांचा फायदा दिसून आला आहे  काही शेतकरी मोठ्या प्रमाणात फळे भाजीपाला  पुरवठा करू इच्छीत असल्यास पुणे मुंबई आणि सातारा येथील गृहनिर्माण  सोसायट्या व अपार्टमेंट मध्ये थेट विक्रिसाठी संपर्क करून देण्याचे नियोजीत आहे. भविष्यात हा समन्वय आणि साखळी अबाधीत रहावी यासाठी कृषी क्रांती कंपनी प्रयत्न करणार आहे.
आपणही आपण आपल्या इतर वॉटसप या माध्यमातून आलेले संदेश मेसेज फॉरवर्ड करावेत जेने करुन जास्ती जास्त शेतकरी स्वयंसहायता समुह, शेतकरी उत्पादक कंपन्या व वैयक्तीक शेतकऱ्यांकडे उत्पादीत सर्व प्रकारच्या शेतमालाला व्यापक प्रमाणावर प्रसिद्धी मिळेल असे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.
        या कामी फरांदवाडी ऍग्रो प्रोडूसर कंपनीचे वतीने सौ स्वाती नाळे कार्यरत असून योगेश भोंगळे कृषी सहाय्यक, सचिन जाधव कृषी सहाय्यक, संजय अभंग कृषी सहाय्यक  अरविंद नाळे कृषी सहाय्यक  यांचे मार्गदर्शन या कामी लाभत आहे
        तसेच का कंपनीचे संस्थापक अध्यक्ष, दत्तात्रय राऊत चेअरमन सौ अर्चना राऊत,व्हॉ चेअरमन सुभाष भांबुरे,सर्व संचालक मंडळ, शरद कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शेतकरी ते ग्राहक फळे भाजीपाला हा व्हाट्सअप ग्रुप कार्यरत आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!