बारामती:प्रतिनिधी बारामती एमआयडीसी मधील उद्योजक किशोर भापकर यांचा वाढदिवस साजरा न करता कोरोना च्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासत बारामती परिसरातील गरजू नागरिकांना वाटप करण्यासाठी एक लाख रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तू चे किट तयार करून प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे किशोर भापकर मित्र परिवार यांनी सुपूर्द केले (बुधवार दि.8 एप्रिल) या प्रसंगी मित्र परिवार चे सर्व सदस्य व प्रशासकीय अधिकारी उपस्तीत होते.
दर वर्षी एमआयडीसी मधील महिला ग्रामीण रुग्णालय मधील रुग्णांना व तांदुळवाडी वृद्धाश्रम येथील ज्येष्ठ व्यक्तींना फळे वाटप व आयोजित केले जाते तर अनाथ आश्रम,मूक बधिर विद्यालय,बाल निरीक्षण गृह व तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व किराणा साहित्य वाटप करण्यात येते त्याच प्रमाणे विविध मंडळे, संस्था च्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात येतो .
परंतु कोरोना च्या संकटाला सामोरे जात असताना सामाजिक भान व जाण जपत समाज्याचे देने लागतो या भावनेतून वाढदिवसाचा खर्च टाळून सदर मदत करत असल्याचे किशोर भापकर मित्र परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.