बारामती :वार्ताहर बारामती शहरातील शिवनंदन हॉस्पिटल यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध क्षेत्रातील 90 जणांनी रक्तदान केले वुई द फ्युचर ग्रुप बारामती च्या सभासदांनी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिरा मध्ये सहभाग घेतला यावेळी रक्तदान करणाऱ्याना प्रशस्तीपत्र देऊन व पेन ड्राइव्ह देऊन सन्मानित करण्यात आले “रक्तदान ही काळाची गरज आहे व बारामती ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा असल्याने ” सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती शिवनंदन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर महेश बोके व डॉक्टर तुषार गदादे यांनी सांगितले.या या वेळी वुई द फयुचर ग्रुप चे लक्ष्मण जगताप,राजेंद्र वणवे,शब्बीर कायमखानी,संदीप गादीया,मंगेश दोशी, प्रशांत गादीया,ऋषिकेश किर्वे, चारुदत्त पेंढारकर, बाळू माने आदी मान्यवर उपस्तीत होते.
फोटो ओळ रक्तदान करणाऱ्यांचा सन्मान करताना डॉ. गणेश बोके व इतर मान्यवर