बारामती: सध्या संपूर्ण जगभरात धमाकुळ घालत असलेला रोग म्हणजे कोरोना व्हायरस होय .बारामती तालुक्यातील सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल मधील विद्यार्थ्यांना कोरोना बद्दलचे मार्गदर्शन करण्यात आले, शिवाय हा आजार कुठून व कसा आला याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली तसेच हा आजार होऊ नये यासाठी काय उपाय करावेत, कशाप्रकारे काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती डॉ.महेश ननवरे सुजित कोथमिरे , स्वाती देशपांडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आली. यावेळेस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर आटोळे, उपाध्यक्ष रेश्मा गावडे, सचिव मानसिंग आटोळे, अलका आटोळे, पल्लवी सांगळे, दिपक बिबे, संस्थेचे सीईओ जायपत्रे सर, विभाग प्रमुख वनवे सर, प्राचार्य दत्तात्रय शिंदे, राधा नाळे, नीलिमा देवकाते, स्वप्नाली दिवेकर व सर्व शिक्षक उपस्थित होते.
फोटो ओळ मार्गदर्शन करताना मान्यवर डॉकटर