बारामती : खास महिलां व मुलींसाठी “होम मिनिस्टर खेळ रंगला वहिनींचा “हा कार्यक्रम घेऊन महिलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्यामधील विविध कलेला खास हक्काचे व्यासपीठ निर्माण करून महिलेलाच विजेता करणारा कार्यक्रम म्हणजे होम मिनिस्टर होय.
या होम मिनिस्टर कार्यक्रमांमध्ये मुलगी वाचवा, मुलगी शिकवा ,स्त्रीभ्रूण हत्या करू नका, झाडे लावा, झाडे जगवा ,घरचा कारभारी (पती)व्यसन मुक्त करू आदी सामाजिक संदेश होम मिनिस्टर च्या कार्यक्रम मध्ये देत बारामती चे निवेदक,व्याखाते श्री अनिल सावळे पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
गेली 15 वर्षा वर्षापासून बारामतीसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नवरात्र उत्सव, गणपती उत्सव, लग्न समारंभ, वाढदिवस,एकसष्टी,निवृत्ती समारंभ, त्याचप्रमाणे जागतिक महिला दिन आदी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने 551 कार्यक्रम घेतले आहेत. यामध्ये विविध खेळ, मनोरंजन, पारंपारिक उखाणे, म्हणी वाक्प्रचार, कविता, नृत्य आणि हिंदी मराठी चित्रपटातील श्रवणीय गाणी आदींचा समावेश असतो .या कार्यक्रमाची ची खास खासियत म्हणजे महिलांसाठी अनेक मनोरंजक खेळ असतात ,यामधून विजेत्यांना खास बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येते तर महिलांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा मध्ये महिलांचे विविध विषयांवरील सामान्य ज्ञान विचारून बक्षिसे दिली जातात. ग्रामीण भागा तील वाड्या वस्त्या ते शहरी भागा तील नामांकित सोसायट्या मध्ये व विविध संस्था मंडळे कार्पोरेट कंपन्या अनेक नामवंत कुटुंब यांच्यासाठी होम मिनिस्टर कार्यक्रम घेतला आहे. बालिकेपासून ते ज्येष्ठ महिला पर्यंत सर्व जणींनी भाग घेतला आहे चार तासाच्या या कार्यक्रमांमध्ये आर डी बर्मन यांच्या गीतावर खास मुली साठी व पुरुष व्यसन मुक्ती साठी गाणी सुद्धा गायली जातात. त्याचप्रमाणे मुलगी वाचवा मुलगी शिकवा स्त्रीभ्रूण हत्या करू नका पर्यावरण वाचवा आधी विषयांवर खास उखाणे म्हणी वाक्प्रचार कविता सादर केले जातात व महिलां कडून म्हणून घेतले जातात व बक्षिसे दिली जातात.सामाजिक प्रोबोधन म्हणून निवेदक श्री अनिल सावळेपाटील व प्रति किशोर कुमार गायक सलीम सय्यद यांनी उत्कृष्ट गाणी बसवलेली आहेत यामुळे महिला वर्गामध्ये ही गाणी सहज पाठ होतात व येथेच खरे समाज प्रबोधन होते. खऱ्या अर्थाने सूत्रसंचालक म्हणून काम करताना सावळेपाटील यांनी होम मिनिस्टर च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे व त्यांना उत्कृष्ट साथ गायक सलीम सय्यद यांनी दिली आहे .
“होम मिनिस्टर च्या साह्याने समाज प्रबोधन होणे गरजेचे आहे, केवळ मानधन न मिळवता सामाजिक आशीर्वाद मिळतात व या माध्यमातून देश सेवा नकळत होते हे महत्वाचे आहे ” अशी माहिती
श्री अनिल सावळे पाटील यांनी दिली .
:खा.सुप्रिया सुळे कडून कौतुक.
“जिनको है बेटिया “हे गीत खास मुलींसाठी बसवले आहे हे गीत व लहान मुलीचे नृत्य पाहून त्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथील होम मिनिस्टर च्या बक्षिस वितरण प्रसंगी खास सन्मान करून कौतुक केले. होम मिनिस्टर मध्ये समाज प्रबोधन ही संकल्पना सर्व सार्वजनिक मंडळांनी राबवावी असेही सांगितले.
मनोरंजन व प्रोबधन यांचा मिलाप होम मिनिस्टर: पौर्णिमा तावरे
होम मिनिस्टर च्या माध्यमातून महिलांचे मनोरंजन करताना बक्षिसे मिळवून देताना महिलांच्या प्रचंड उपस्तीती चा फायदा घेत श्री सावळेपाटील सर उत्कृष्ट समाज प्रबोधन चे कार्य महिलांपर्यंत व मुलींपर्यंत पोहोचवतात व या दोघी कार्यक्रम झाल्यानंतर सर्व कुटुंबात हा विचार पोहोचवतात त्यामुळे सावळे पाटील प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रम म्हणजे मनोरंजन व प्रोबधन चा उत्कृष्ट मिलाप आहे याची मी साक्षीदार आहे अशी प्रतिक्रिया जिजाऊ भवन येथील होम मिनिस्टर बक्षीस वितरण प्रसंगी बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पूर्णीमा तावरे यांनी दिली.