माळेगाव : प्रतिनिधी जागतिक महिला दिना निमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्वाण महिलांचा सन्मान,रांगोळी,वेशभूषा,मेहंदी,लेक-आई वेशभूषा, एक मुलगी असणाऱ्या महिलांचा सन्मान व मान्यवर महिलांचे मार्गदर्शन आदी कार्यक्रम च्या माध्यमातून माळेगाव फेस्टिव्हल संपन्न झाला.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री नेहा कोकरे, चंदूकाका सराफ अँड सन्स च्या संचालिका सेजल शीतल पाटील,पोलीस उपनिरीक्षक अश्विनी शेंडगे,वाहन निरीक्षक पौर्णिमा तावरे,यशश्री फौंडेशन च्या अध्यक्षा सुप्रिया बर्गे,माळेगाव ,पणदरे,माळेगाव खुर्द,भिकोबानगर पाहुणेवाडी च्या महिला सरपंच व महिला सदस्या, माळेगाव फेस्टविल च्या आयोजिका प्राची तावरे,धनश्री काळे,क्षितिजा जगताप आदी मान्यवर उपस्तीत होत्या.
अनिल सावळे पाटील प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रम मध्ये प्रथम विजेत्या कोमल जाधव,द्वितीय सिंधू तारक, त्रितीय अर्चना टेकवडे विजेत्या ठरल्या.”ग्रामीण भागातील महिला सुद्धा विविध क्षेत्रात उल्लेखनिय यश मिळवू शकतात व माळेगाव फेस्टविल मुळे महिलांना कला गुण प्रदर्शित करण्यास हक्काचे व्यासपीठ निर्माण झाल्याचे” अभिनेत्री नेहा कोकरे यांनी सांगितले.या वेळी विविध महिला मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल सावळेपाटील यांनी केले.माळेगाव मध्ये प्रथम महिलासाठी आशा प्रकारच्या कार्यक्रम चे आयोजन केल्याबद्दल महिलांनी आयोजकाना धन्यवाद दिले व समाधान व्यक्त केले.
फोटो ओळ: होम मिनिस्टर विजेत्या समवेत अभिनेत्री नेहा कोकरे,प्राची तावरे,धनश्री काळे,क्षितिजा जगताप व इतर (छाया संदीप गुरव)