फलटण – फलटण शहरामध्ये नुकताच एका व्यापारी व फायनान्स कंपनी विरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील विविध व्यापारी संघटनांनी आज उपविभागीय अधिकारी तसेच फलटण शहर पोलीस स्टेशन याठिकाणी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की फलटण शहरातील मोबाईल विक्रेता व्यापार्यावर दाखल झालेला गुन्हा अन्यायकारक असून योग्य ती खबरदारी घेऊन फलटण शहरातील व्यापारी होणारा अन्याय दूर करावा.
या व्यापारी संघटनांमध्ये फलटण शहर व्यापारी संघटना, फलटण मोबाईल असोसिएशन, फलटण बिल्डर्स असोसिएशन, फलटण प्रिंटरस असोसिएशन फलटण डॉक्टर असोसिएशन, फलटण मेडिकल असोसिएशन, यांच्यासह प्रमोद निंबाळकर विष्णू सूळ डॉक्टर सुभाष गुळवे सागर दोषी स्वप्निल टिळेकर अनिल शिरतोडे महेंद्र जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
फायनान्स कंपन्या व कर्जदार यांचा व्यापाऱ्यांचे कुठेही काडीमात्र संबंध नसतो केवळ वस्तू विक्री करणे हाच हेतू असून फायनान्स कंपनी कायदेशीर मार्गाने वसुली करत असते. कंपन्यांच्या वसुलीमध्ये व्यापाऱ्यांचा कोणताही संबंध नसतो. असे असतानाही काही समाजकंटक व्यापाऱ्यांवर दहशत निर्माण करण्याच्या हेतूने खोटे गुन्हे दाखल करत आहेत. यामुळे फलटण शहरातील व्यापारी दहशतीखाली असून व्यापारी मानसिक दृष्टीने कसला गेला आहे. फलटण व्यापारी संघटनेच्या माध्यमातून आपणास विनंती करतो की अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल न करता योग्य तो तपास करून पुढील कारवाई करण्यात यावी. आतापर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यांची योग्य ती तपासणी करावी, पुन्हा अशा स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल झाल्यास व्यापारी संघटनेला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला.
सदर निवेदन फलटण उपविभागीय अधिकारी, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप पोमण साहेब यांना देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.