बारामती : क्रीडा भारती बारामती आयोजित तालुकास्तरीय 48 किलो वजनी गटातील स्पर्धेमध्ये जनहित प्रतिष्ठान विद्यालयाच्या मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक संपादन केला . या स्पर्धेमध्ये बारामती तालुक्यातील विविध संघांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये अतिशय अतीतटीच्या सामन्यांमध्ये जनहित प्रतिष्ठान विद्यालयाच्या मुलींच्या संघाने बाजी मारली व तृतीय क्रमांक संपादन केला कु. साक्षी गावडे, कु. वैष्णवी बुचडे, कु रागेश्वरी पिसाळ ,कु.ज्योतिर्मयी शिंदे, कु. मधुरा कुंभार, कुमारी समृद्धी घाडगे, कु. वैष्णवी साबळे, कु. रिया भागवत, या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला. या क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट क्रीडा शिक्षक म्हणून जनहित प्रतिष्ठान विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सचिन नाळे यांना उत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री किशोर कानिटकर ,संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री श्रीकृष्ण कुलकर्णी, संस्थेचे सचिव मा. श्री श्रीकांत बहुळकर, संस्थेचे खजिनदार मा.श्री सतीश धोकटे व सर्व संचालक तसेच विविध मान्यवरांनी व आचार्य हनुमंत दुधाळ मुख्याध्यापक श्री अतुल कुटे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले