आसु: मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर काँलेज फलटण .या ठिकानी महिला दिनानिमित्त सौ. कविता ताई म्हेत्रे बोलत होत्या .माँ जिजाऊ ,सावित्री बाई लेकीना समाजात वावरत असताना आरक्षण ची नाही तर स्वसंरक्षणाची गरज आहे .
सध्या महिला सर्वच स्तरावर पुरुषाचा खंद्याला खंदा देऊन काम करतात पण अशा परस्थीत महिलानां स्वसंरक्षण कसे करावे यांचे धडे देणे गरजेचे आहे .या वेळी अध्यक्षस्थानी फलटण पंचायत समितीच्या उपाध्यक्षा रेखाताई खरात होत्या.यावेळी कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले त्यानंतर अध्यक्षा रेखाताई खरात यांचे स्वागत प्राचार्य हंकारे सर यांनी केले तसेच प्रमुख पाहुणे प्राध्यापक कविताताई म्हेत्रे यांचे स्वागत रेखाताई खरात यांनी केले यावेळी
प्रशालेचे प्राचार्य श्री हंकारे सर यांनी महिलाचे शिक्षणातील महत्व या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी विशेषकरून महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते
या काय्ँक्रमाचे प्रस्तावना कदम मँडम नी केले
सुत्रसंचालन मोरे मँडम यांनी केले तर आभार कदम सरानी मानले