बारामती: भारतीय डाक विभागच्या वतीने घेण्यात आलेल्या पोस्टल असिस्टंट या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये एमआयडीसी येथील सत्यमेव करिअर अकॅडमीच्या राणी रोहन जाधव यांनी पुणे विभागातून तृतीय क्रमांक संपादन केला तसेच पोस्टल असिस्टंट पदी निवड होणार्या पुणे विभागातील त्या एकट्याच महिला आहेत. विशेष बाब म्हणजे झालेल्या परीक्षेत गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांत त्यांनी 40 पैकी 39 गुण संपादन केले तर बुद्धिमापन या विषयात त्यांनी पैकीच्या पैकी गुण संपादन केले
सत्यमेव अकॅडमी चे संचालक शरद नामदे, संचालक संतोष जगताप, क्रीडा प्रशिक्षक गोविंद भोसले, अजित गोरे, नवनाथ फाळके तसेच सत्यमेव परिवारातील सर्व प्रतिनिधींनी त्यांचे अभिनंदन केले आहे