जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी सातारा निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

फलटण /प्रतिनिधी :रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या वतिने वतनी जमिनी रामोशी लोकांच्या नावे होत्या त्या परत मुऴमालकाच्या नावे कराव्यात तसेच खरेदी विक्री बाबत अध्यादेश शिथिल करण्यात आला आहे तो अध्यादेश रद्द करण्यात यावा अशा विविध मागणीचे निवेदन जय मल्हार क्रांती संघटनेचे वतिने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
कार्याध्यक्ष संजय जाधव, दीपक मदने, कोर कमिटी सदस्य बाळासाहेब मदने, जिल्हा अध्यक्ष दादासाहेब मंडले, बापुराव शिरतोडे, रामदास मदने, अॅड राहूल मदने, अॅड विशाल शिरतोडे, शामराव मदने, विशाल जाधव जिल्हा युवक अध्यक्ष, किरण चव्हाण, प्रभाकर चव्हाण, संदीप भंडलकर, श्रीकांत चव्हाण, योगेश चव्हाण, विनोद चव्हाण, सागर मंडले, आबासाहेब जाधव, अंकुश जाधव, सुनिल जाधव, सोमनाथ यादव, घनश्याम बोडरे, हनुमंत जाधव,बापू मदने, सागर जाधव यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, रामोशी, बेरड, बेडर समाजातील अशिक्षीत पणाचा , व्यसनाधिनतेचा गैरफायदा घेऊन व त्यावर आपला बेकायदेशीरपणे कब्जा आनाधिकृतपने ठेवला त्याच्यातच भर म्हनून सदर जमिनीच्या हस्तांतरनास ज्या जाचक आटी होत्या त्या शिथिल झाल्याने धनदांडग्यांनी रामोशी समाजातील लोकांना फसवून त्या वतनी जमीनीवर हस्तांतर करने व जबरदस्तीने अथवा फसवनूक करून सदर वतनी जमीनींचे व्यवहार करन्यास सुरवात केली. यामुळे रामोशी, बेरड, बेडर समाज हा भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहे.
सदर वतनी जमिनी ज्या रामोशी लोकांच्या नावे होत्या त्या परत मुऴमालकाच्या नावे कराव्यात. तसेच खरेदी विक्री बाबत जो अध्यादेश काढला होता तो शिथिल करण्यात आला आहे. तो अध्यादेश रद्द करण्यात यावा. वतनी जमिनी चे जे खोटे व्यवहार झालेले आहेत.
वतनी जमिनी च्या व्यवहाराची चौकशी करून ती जमीन मुळ मालकाला देण्यात यावी.
रामोशी वतनी जमीनी चे रिग्रँड झाल्यानंतर त्या जमीनी कुळ लावन्यात आल्या आहे ते रद्द करण्यात यावे.
जमिनी धारण करणार्‍याचे नाव वतनी जमिनीच्या मालकी हक्कावर लावन्यात आले आहे ते रद्द करण्यात यावे.
जिल्हाधिकारी यांची पुर्व परवानगी न घेता खरेदी खत करण्यात आलेली आहेत ते खरेदी खत बेकायदेशीर असल्याने ते रद्द बातल करण्यात यावेत. २००२ व २००८ चा जी आर रद्द करून त्या आंतर्गत झालेले सर्व व्यवहार रद्द करावेत.आनाधिकृत धारकाने तिप्पट शेतसारा न भरता आथवा नझरान्याची रक्कम न भरता बेकायदेशीर पणे स्वताच्या नावाची नोंद करून घेतलेले आहे ती रद्द करण्यात यावी
वतनी जमीनी ठरावीक मुदतीसाठी भाडेपट्याने दिलेल्या आसतांना त्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्या नंतर त्या जमिनी मुळ मालकाना परत न करता बेकायदेशीरपने आनाधिकृत धारकाने स्वताच्या नावाची नोंद त्या वतनी जमिनीच्या बेकायदेशीरपने ७/१२ ला लावून घेतली आहेत ते रद्द करण्यात यावेत
रामोशी समाजाला कुठलाही पुर्वापर धंदा व व्यवसाय नाही गडकिल्लेवर रखवाली करने हे त्यांचे काम होते ते काम काढून घेतल्यानंतर या समाजाला उपजिविकेचे साधन राहीले नाही तो रानावनात भटकत होती. तो रानवासी झाला यामुऴे रामोशी, बेरड, बेडर समाजाचे तरूण बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेऴ आल्याने या समाजाला पोलिस व आर्मी खात्यामधे तरूणांना राखीव जागा मिऴाव्यात. वतनी जमीन हस्तांतरणाचा अधिकार नसलेल्या अधिका-यांनी रामोशी वतनी जमिनी सरकार जमा करून घेतले आहे त्या बिनशर्त परत मिऴाव्यात.रामोशी समाजातील लोकांचा वतनी जमिनीवर ७/१२ वर सदरी नोंद असताना धनदांडग्यांनी दडपशाहीने बेकायदेशीपने सदर जमीनीचा ताबा स्वाता कडे ठेवला आहे तो ताबा रामोशी समाजातील मुऴ मालकांना मिळाव्यात .काही रामोशी वतनी जमिनीवर सरकार व फाँरेस्ट चे नाव लागलेले आहे ते कमी करून मुऴ मालकाचे नाव लावून त्या वतनी जमिनीचा ताबा मिळावा .मागील सरकारने रामोशी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावे महामंडऴाची स्थापना करून १०० कोटीची निधीची घोषणा केली होती. तो निधी आपल्या सरकारने लवकरात लवकर रामोशी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी उप्लब्ध करून देण्यात यावे.
रामोशी, बेरड, बेडर समाज हा एकच असून या समाजाला विविध राज्यात विविध नावाने ओऴखले जाते. त्यांचे रोटी बेटी व्यवहार होतात, त्यांचे देव देवता, एकच आहेत, लग्न, बारशे, नाव ठेवने, वर्षश्राध्द याची परंपरा एकच आहे. असे असताना बेडर समाजाला आनुसूचित जातीचे आरक्षण मिऴाले आहे मात्र रामोशी, बेरड समाज हा विमुक्त जातीमधे आहे.
रामोशी व बेरड समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिऴावे ही विनंती. रामोशी, बेरड, बेडर समाजाचा विकास आराखडा तयार करण्यात यावा.रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या भबमिहीन लोकांना नविन शेत जमिन खरेदी करते वेळी शेतकरी कुटूंबातील असल्याचा दाखला अथवा शेतीचा ७/१२ जोडण्याची अट शिथिल करण्यात यावी.
रामोशी, बेरड, बेडर समाजाचा मागण्यांचा सहानभूतीपुर्वक विचार करावा.
तसेच येणा-या अधिवेशन काऴत पुणे विभागीय आयुक्त कार्यालय व मुंबई आझाद मैदान येथे मोर्चा काढण्यात येणार आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!