बारामती: वार्ताहर दहावी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी पालक,शिक्षक यांनी शुभेच्छा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे शालांत परीक्षा आज मंगळवार दि. 3/3/2020 पासून सुरु होत आहे. “आई वडिलांच्या स्वप्नांची व कष्टाची पूर्तता करण्याचा क्षण म्हणजे शालांत परीक्षा आणि आज तो क्षण आला आहे, त्या क्षणाचे सोने करा “, असे उदगार विद्या प्रतिष्ठान केंद्रप्रमुख बाळकृष्ण खरात यांनी काढले.
“जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी शालांत परीक्षा फार महत्वाची आहे. आणि यातूनच तुमचे भविष्य घडणार आहे”. असे उद्गार श्री महेश विधाते सहा. पोलीस निरीक्षक बारामती ग्रामीण यांनी काढले.
विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेच्या शालांत परिक्षेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक यांचे गुलाब पुष्प देऊन मान्यवरांनी स्वागत केले.
स्वागत समारंभासाठी
पंचायत समिती सदस्य भारत नाना गावडे पाटील , शाळेचे मुख्याध्यापक व केंद्रसंचालक रामचंद्र शिंदे, उपमुख्याध्यापक अर्जुन हिवरकर, पर्यवेक्षिका सौ. संगीता साठे व शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
फोटो ओळ विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना पालक,शिक्षक