बारामती:वार्तापत्र येत्या उन्हाळ्यात वन्य जीवांना पिण्याच्या पाण्याची सोय व्यावी या साठी सिमेंटचा पाण्याचा साठवण हौद तयार करून त्या मध्ये पिण्याचे पाणी टँकरने सोडणे हा उपक्रम शरयु फौंडेशन च्या वतीने सुरू करण्यात आला. त्याचा शुभारंभ कण्हेरी येथील वनविभागाच्या हद्दीत करण्यात आला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शरयु फौंडेशन च्या अध्यक्षा शर्मिला पवार उपस्तीत होत्या या वेळी
वनधिकारी राहुल काळे,त्र्यम्बक जराड वनकर्मचारी सेजल कांबळे,मनीषा गुरव,नगरसेवक सुधीर पानसरे,अजितदादा युथ फौंडेशन चे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड व राहुल चौधर,सचिन घाडगे,दत्ता माने,अरविंद काळे,ओंकार महाडिक,पंकज मुटेकर,संतोष माने आदी मान्यवर उपस्तीत होते.बारामती व इंदापूर परिसरातील वनविभागातील वन्यजीव यांच्यासाठी पिण्याचे पाणी टँकर द्वारे देण्यात येणार असल्याचे शरयु फौंडेशन च्या वतीने सांगण्यात आले.