बारामती: जिद्द,चिकाटी व आत्मीश्वास च्या जोरावर जीवनात ‘खरे यश’ मिळवा. पैसा, वशिला या पेक्ष्या खरे यश समाधान व आनंद जीवनात कायमस्वरूपी देत राहते असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याखाते, पत्रकार अनिल सावळेपाटील यांनी केले.
बारामती शहर भारत स्काऊट्स आणि गाईड्स स्थानिक संस्था ,कटफळ ग्रामपच्यात, जिल्हा परिषद शाळा व अजितदादा इंग्लिश मिडीयम स्कुल कटफळ यांच्या संयुक्त विद्यामानाने 13 वा तालुका मेळाव्याचा शुभारंभ कटफळ येथे संपन्न झाला. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनिल सावळेपाटील बोलत होते या वेळी
कटफळ च्या सरपंच सारिका मोकाशी,उपसरपंच मुकिंद मदने, तालुका स्काऊट गाईड चे कार्याध्यक्ष जे.पी. जगताप,उपाध्यक्षा विजयाताई खटके,ग्रामपच्यात सदस्य संजय मोरे व बापूराव मदने,भारत मोकाशी,बाळासो आटोळे,बालाजी झगडे,जिल्हा परिषद शाळा मुख्यध्यापक हरी सर,प्रमुख स्काऊट सु.गो.सोनवणे,प्रमुख गाईड संगीता मोकाशी,स्काऊट गाईड चिटणीस तात्यासाहेब माने,माजी सहायक जिल्हा आयुक्त मोरेशवर ऐतवाडकर सहायक आयुक्त स्काऊट शहाजी वाघमारे,अविनाश काटकर,कंगणे सर,हनुमंत फणगे , आदी मान्यवर उपस्तीत होते.
“जीवनात दिखाऊ पेक्षा टिकाऊ बना,टीव्ही,संगणक,मोबाईल चा कामा पुरता वापर करा तर चौफर वाचन करा मैदानी खेळ जास्त खेळा शारीरिक व बौद्धिक विकास घडवत जीवनात यशस्वी व्हा” असा सल्ला अनिल सावळेपाटील यांनी दिला
‘बेडेन पॉवेल’ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. ध्वजारोहण सरपंच सारिका मोकाशी यांच्या हस्ते करण्यात आले.स्काऊट गाईड चा प्रचार व प्रसार व्हावा,प्राथमिक शाळा मध्ये कब बुलबुल,उच्च माध्यमिक शाळा मधून रोव्हर रेंजर युनिट सुरू करणे आदी विषयी माहिती संयोजकांनी दिली.या वेळी विविध शाळा मधील विद्यार्थ्यांनी संचलन केले.सूत्रसंचालन पी डी सोनवणे,वृषाली पोमन,मयुरी शेळके यांनी केले स्वागत गीत अजितदादा इंग्लिश मिडियम स्कुल च्या विद्यार्थ्यांनि सादर केले.इंदापूर व बारामती तालुक्यातील विविध शाळा मधील पाचशे विद्यार्थ्यां नी सदर मेळाव्यात सहभाग घेतला आहे.3 दिवस होणाऱ्या मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.