फलटण :- शहरातील रिंगरोड डी एड कॉलेज चौकामध्ये मध्यरात्री चोरट्यांनी चार दुकाने फोडुन 25 हजार रुपये चोरीस गेले आहेत मागील काही दिवसांपासून फलटण शहरात चोऱ्याचे प्रमाण वाढले असून या वाढत्या चोऱ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार, रिंगरोड डीएड कॉलेज चौक येथील मोनिता विश्व आपार्टमेंट गाळा नं 4 व 5 मध्ये प्रदिप विठ्ठल सावंत यांचे मिल्ट्री कॅन्टींन दुकान आहे दि 7 रोजी मध्यरात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तीने शटरचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून बझारचे कैश काउंटर मध्ये ठेवलेले सुमारे 25 , 610 रूपये चोरून नेहले .
डीएड कॉलेज चौक हा नेहमीच वर्दळीचा चौक असून येथे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक दुकाने आहेत. या चौकातील मिल्ट्री कॅन्टींन नावाचे खाजगी स्वस्त वस्तू ग्राहक भांडार या दुकानापासून काही अंतरावर असणाऱ्या विकास बाबासो शिंदे व अनिकेत खंडु घनवट यांचे दुकानही चोरट्यांनी फोडले आहे.दुकानात प्रवेश करून आतील किरकोळ रकमा चोरून नेल्या आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता ही चोरीची बाब निदर्शनास आली असता बझारचे शटर कुलुप तुटलेले दिसले तसेच शटरचा पत्रा वाकडा तिकडा केलेला दिसला.
या चोऱ्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या असून दुकानाची शटर उचकटताना चोरटे स्पष्ट दिसत आहेत. त्यांनी तोंडाला मास्क गुंडाळल्याचे हि दिसत आहे. या घटनेची रात्री उशिरापर्यंत फलटण शहर पोलीस ठाण्यात प्रदिप विठ्ठल सावंत वय – 26 वर्षे व्यवसाय – शेती मुळ रा . सावंतवाडी ( उपळवे ) ता फलटण यांनी दि 8 रोजी उशिरा गुन्हा दाखल केला आहे.