पोलीस प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही रात्रीचे वेळी सतर्क राहणे गरजेचे

फलटण : शहरात घरफोडीच्या घटनांचे सत्र संपताच आता ग्रामिण भागातील  राजुरी परिसरात जवळ पास 5 ते 6 वेगवेगळ्या घरफोडीच्या घटनांमध्ये लाखोंचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी कोळकी येथील एका रहिवासी इमारतीमध्ये एकाच रात्री 2 फ्लॅट फोडण्यात आले होते. कोळकीत ज्या दिवशी सदरील प्रकार घडला त्या दिवशी फलटण शहरालगत असणाऱ्या जाधवाडी परिसरामध्ये ही घरफोड्या करण्यात आलेल्या निदर्शनास येत आहे. याबाबत पोलिस प्रशासनाने त्वरित योग्य ती पावले उचलून चोरट्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही रात्रीचे वेळी सतर्क राहणे गरजेचे आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी कोळकी तालुका फलटण येथे असणाऱ्या जीत हॉटेल च्या नजीकच्या इमारतींमध्ये दोन घरफोड्या झाल्या होत्या. त्या घरफोड्या मध्ये तर सेफ्टी डोअर असूनही घरफोडी करण्यात आलेली होती. जाधववाडी परिसरामध्ये त्याच दिवशी घरफोडी करण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आलेला होता व काही अशी चोरटे घरफोडी करण्यामध्ये यशस्वीही झालेले आहेत. पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आपला बंदोबस्त वाढून किंवा रात्रीच्या गस्त वाढवून या घरफोड्यांचे प्रमाण बंद केले पाहिजे अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
दोन दिवसापूर्वी राजुरी तालुका फलटण येथे पाच ते सहा घरांची घरफोडी झाल्याचे घटना समोर येत आहे. तशी चर्चा राजुरी पंचक्रोशी सुरू आहे. ह्या घरफोडी करणाऱ्या टोळीला लवकरात लवकर जेरबंद करावे व अशा टोळक्यांना वेळीच लगाम लावावा अशी मागणी राजुरी पंचक्रोशीतील नागरिक करीत आहेत.
गत आठवड्यामध्ये राजाळे तालुका फलटण येथे असणाऱ्या रुद्र बझार मध्ये चोरट्यांनी चोरी करून बझार मधील कपडे व इतर वस्तू लंपास केल्याची घटना ही ताजीच आहे. त्यामुळे फलटण शहरासह ग्रामीण भागातही हे चोरटे चोरी करण्यासाठी येत आहेत. नागरिकांनी रात्रीच्या वेळी व दिवसाही सतर्क राहून आपल्या आसपास कुठे काही प्रकार घडून येताना दिसल्यास त्वरित पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा व कोणत्याही कारणावरून अनोळखी व्यक्तीला आपल्या घरामध्ये प्रवेश देऊ नये. चोरटे हे दिवसा काही ना काही काम करून रात्री चोरी करतात अशीही शक्यता नागरिकांमधून वर्तवली जात आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!