भव्य नागरी सत्कार व वार्षिक स्नेहसंमेलन समारोपाच्या (जल्लोष २०२०) कार्यक्रमाचे आयोजन

आसु : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिंडवस्ती (साठेफटा) यांच्यावतीने फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे हॅट्रीक आमदार मा. दिपकराव चव्हाण व फलटण पंचायत समितीचे नुतन सभापती मा. श्रीमंत शिवरूपराजे निबांळकर-खर्डेकर  उर्फ बाळराजे यांचा भव्य नागरी सत्कार व वार्षिक स्नेहसंमेलन समारोपाच्या (जल्लोष २०२०)  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

 या कार्यक्रमासाठी फलटण- विधानसभा मतदार संघाचे हॅट्रीक आमदार दिपकराव चव्हाण, फलटण पंचायत समितीचे सभापती व संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मा. श्रीमंत  शिवरूपराजे निबांळकर-खर्डेकर  उर्फ बाळराजे, जिल्हा परिषद सदस्या उषादेवी गावडे, फलटण पंचायत समितीचे सदस्य संजय कापसे, विश्वासदादा गावडे, फलटण पंचायत समितीचे भाग शिक्षण विस्तार अधिकारी मा. सि.जी.मठपती, निंबळक केंद्राच्या केंद्रप्रमुख मा. अलका जाधव,साठे गावच्या सरपंच सौ. छबुताई माने,उपसरपंच जगन्नाथ खांडेकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मिंड,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, साठे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायीचे सर्व सदस्य, साठे गावचे आजी-माजी सरपंच, सोसायटीचे आजी-माजी चेअरमन-व्हाईसचेअरमन, राहुल मिंड माजी उपसरपंच साठे, विठ्ठलभैय्या कदम चेअरमन,पोलीस पाटील, सर्व तरूण मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, परिसरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
        वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शकुंतला पवार मॅडम यांनी केले. फलटण पंचायत समितीचे नुतन सभापती मा. शिवरूपराजे निबांळकर-खर्डेकर उर्फ बाळराजे यांनी आपल्या मनोगतात शाळेतील आठवणी सांगितल्या व फलटण तालुक्यातील प्राथमिक शाळांनी आता अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल चालू असून तालुक्यातील सर्व शाळांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले. 
त्याचप्रमाणे मिंडवस्ती शाळेचे त्यांनी राबविण्यात येत असलेल्या सर्व कार्यक्रमाची प्रशंसा केली व शाळेस सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन सांस्कृतिक कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. 
      फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. दिपकराव चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासित केले. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात पाठीमागे नसून सर्वच क्षेत्रात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आघाडीवर असल्याचे सांगून स्वतः ही जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी असल्याचे सांगितले. मिंडवस्ती शाळेने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रशंसा करून शाळेतील विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे कौतुक करून अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले व शाळेस  गावास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. केंद्रप्रमुख अलका जाधव मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. कु.कुतीका मिंड हीने शेतकर्यांच्या समस्यांवर मनोगत व्यक्त केले. 
    यावेळी साठे गावाच्या व मिंडवस्ती (साठेफटा) शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने फलटण -कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे हॅट्रीक आमदार मा. दिपकराव चव्हाण व पंचायत समितीचे नुतन सभापती मा. शिवरूपराजे निबांळकर-खर्डेकर  उर्फ बाळराजे यांचा सत्कार करण्यात आला. 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिंडवस्ती (साठेफटा) शाळेत प्रथमच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर कार्यक्रमाचे सादरीकरण केले. छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा या कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्टपणे सादरीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्वच कार्यक्रमाचे सादरीकरण अतिशय उत्कृष्टपणे करण्यात आले.ग्रामस्थ, पालकांनी कार्यक्रमास अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश बोराटे सर व भोसले सर यांनी केले. आभार खेडकर सर यांनी मानले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!