गोखळी (प्रतिनिधी ) फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील राजाळे येथील रूद्र बझार मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून लाखो रुपयांचा मुद्दे माल लंपास केला.आज बुधवारी सकाळी बझार उघडण्यासाठी गेले असता घडलेला प्रकार लक्षात आला. या घटनेची माहिती फलटण पोलीस स्टेशनला देण्यात आली असता पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी तातडीने भेट देऊन घडलेल्या घटनांची माहिती घेतली सातारा येथील श्वान पथकाने व ठस्से तज्ञांना तातडीने पाचारण करून सबंधीतांनी माहिती घेतली. फलटण उपविभागीय पोलीस उपनिरक्षक बरडे साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या घटनांची माहिती घेतली.
तीन वर्षापूर्वी गोखळी येथील मच्छिद्र सुर्यकांत धर्माधिकारी, सचिन शिवाजी गावडे, प्रवीण जालिंदर कदम या बेरोजगार युवकांनी फलटण -आसू मार्गावर राजाळे येथे रूद्र बझार उभारला आहे. मंगळवारी मध्यरात्री बझारचे पश्चिम बाजू कडून पञा उचकाटून प्रवेश करून किल्ल्या घेऊन बझारचे शटर उघडून बझार मधील अंदाजे पाच लाख रूप यांच्या आसपास मुद्देमाल चोरीला गेल्याचे बझारचे चालक मच्छिंद्र धर्माधिकारी यांनी सांगितले.
यापूर्वी फलटण पूर्व भागातील गोखळी आसू पवारवाडी शटर तोडून चोरी च्या घटना घडल्या सदर घटनेचे सी.सी.टी.व्ही फूटेज पोलिसांनी तपासणी करून सुध्दा घडलेल्या घटनांचा अद्याप तपास न लागल्याने नागरीकांचे कडून पोलीस तपास यंञणेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. बेरोजगार युवकांनी कर्ज काढून उद्योग व्यवसाय उभारावेत तर चोरी च्या घटनांमुळे पुन्हा युवा वर्ग अडचणीत येताना दिसत आहेत .