फलटण दि. १५ : निंबळक ता फलटण येथील नवनाथ अशोक यादव ( वय 26) हा शेतात विहिरीवरील मोटार सुरु करण्यास गेला असता खोक्याला आलेला करंट लागून जागेवरच मृत्यू झाला आहे.
नवनाथ यादव हा अविवाहित असून परिसरातील सर्वाशी मनमोकळेपणाने वागणारा व मराठा क्रांती मोर्च्या च्या वेळी सर्वाना एकत्रित करण्यामध्ये त्याचा वाटा होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूने निंबळक गावात हळहळ व्यक्त होत आहे.
यापूर्वी निंबळक येथे मतकर पती पत्नी यांना वीज वितरणच्या तुटलेल्या तारेमुळे शाक लागून प्राण गमवावे लागले असून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला असून निंबळक शाखा अभियंता व कर्मचारी यांचा हलगर्जी पणा पाहायला मिळत आहे.
याबाबतची नोंद ग्रामीण पोलिस स्टेशनला झाली आहे.