पंचवार्षिक निवडणूक निमित्ताने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये या अनुषंगाने आज रविवार दि. 13 आॅक्टोंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रुट मार्च

क्राईम

फलटण दि. 13 :  255 (अ. जा.) फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आगामी होणार्‍या पंचवार्षिक निवडणूक निमित्ताने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये या अनुषंगाने आज रविवार दि. 13 आॅक्टोंबर रोजी लोणंद पोलीस स्टेशन अंतर्गत असणार्‍या फलटण तालुक्यातील 
गावामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रुट मार्च घेण्यात आला. 
आगामी होणाऱ्या  फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विधानसभा निवडणुक व लोकसभा पोटनिवडणूक अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील  फलटण तालुक्यातील हिंगणगाव ,आदर्की, सासवड, तरडगाव या गावातून  लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाण्याचे कर्मचारी, सीआयएसएफ जवान व होमगार्ड यांनी रूट मार्च केला. 
फलटण कोरेगाव येथील विधानसभा निवडणुकीत मतदार यांनी सोमवार दि. 21 आॅक्टोंबर रोजी शांततेमध्ये सर्वांनी आपले मतदान करुन यशस्वीरित्या मतदान प्रक्रिया पार पाडावी व सहकार्य करावे असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!