फलटण : 255 (अ. जा.) फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार दिगंबर आगवणे यांच्या प्रचारार्थ फलटण येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माढा येथील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील माजी आमदार जयकुमार गोरे जिल्हा परिषद सदस्या सौ जिजामाला नाईक-निंबाळकर, सौ. मंदिकिनी नाईक निंबाळकर उमेदवार दिगंबर आगवणे यांची उपस्थिती होती.
सध्याची विधानसभा निवडणूक एकतर्फी असून समोर कोणी दिसतच नाही. विधानसभा निवडणुक सुरु असताना काँग्रेस प्रमुख राहुल गांधी बँकॉक मध्ये काय करीत आहेत. आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ अशी अवस्था पवार यांची झाली असून सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे विलीनीकरण करावे असे वक्तव्य केले आहे. सुशीलकुमार शिंदे हे दृष्ठे आहेत. आता विरोधी पक्ष नेतेपद टिकविण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव दिला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कार्यक्रमास नगरसेवक फलटण कोरेगाव तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी सरपच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्यासह ग्रामस्थ व नागरिक महिला तरुण उपस्थित होते.