२५५ (अ. जा.) फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शुक्रवार दि. ४ आॅक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वैयक्तिक व अनेक राजकीय पक्षांनी मिरवणुक काढून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
फलटण – कोरेगाव २५५ (अ. जा.) विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. दिपकराव चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सुभाषराव शिंदे श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर बाळासाहेब सोळसकर डी. के. पवार दिलीपसिंह भोसले नगराध्यक्षा सभापती यांच्यासह फलटण नगरपालिका, सातारा जिल्हा परिषद सदस्य, फलटण पंचायत समिती व फलटण तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
सकाळी ११ वाजता फलटण येथील दैवत श्रीरामचे दर्शन आ. दिपक चव्हाण यांनी घेतलेवर उपस्थित अन्य नेते यांच्यासह ढोल ताशा व हलगीच्या आणि फटाक्यांची आतषबाजी करीत शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणुक काढून व शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
शुक्रवार दि. ४ आॅक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
महायुतीचे उमेदवार व स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे यांच्यासह भाजपा व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.