स्वयंसिद्ध महिला उद्योग समूह जायंटस ग्रुप आफ फलटण सहेली व जय तुळजाभवानी ग्रुप फलटण व राजे ग्रुप पुरस्कृत दांडिया धमालचे आयोजन

फलटण दि. ३ : येथील स्वयंसिद्ध महिला उद्योग समूह जायंटस ग्रुप आफ फलटण सहेली व जय तुळजाभवानी ग्रुप फलटण यांचे संयुक्त विद्यमाने व राजे ग्रुप पुरस्कृत दांडिया धमालचे आयोजन रविवार दि. ६ आॅक्टोंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता अनंत मंगल कार्यालय फलटण येथे करण्यात आल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
स्वयंसिद्ध महिला उद्योग समूह जायंटस ग्रुप आफ फलटण सहेली व जय तुळजाभवानी ग्रुप फलटण व राजे ग्रुप पुरस्कृत दांडिया धमालचे आयोजन फलटण येथे दरवर्षी करण्यात येत असून हे १३ वे वर्ष असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 
दांडिया धमालमध्ये लहान मुली तरुणी व महिला यांना प्रवेश फक्त देण्यात येत असून कोणत्याही वयोगटातील महिला यांना यामध्ये सहभागी होता येत असून यासाठी प्रवेशिका आवश्यक असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. 
दांडिया धमाल यामध्ये सहभागी झालेल्या महिला व तरुणी यांचे वेगवेगळे दोन ग्रुप करण्यात येत असून त्यामध्ये ड्युयट व सोलो असे ग्रुप करण्यात येणार असुन महिला यांच्यासाठी ही दांडिया धमाल आहे. यासाठी संयोजक गेले १५ दिवस दांडियाचे प्रशिक्षण देत असल्याचे पत्रकात नमूद केले आहे. 
दांडिया धमालमध्ये सहभागी झालेल्या महिला व विजेत्या यांना घरगुती वस्तू व पैठणी साड्या भेट म्हणून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 
फलटण व परिसरातील तरुणी व महिला यांनी दांडिया धमालमध्ये सहभागी होवून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!