फलटण दि. २ : येथील आर्यमान फाऊंडेशन यांच्यावतीने गणेशोत्सव कालावधीत आयोजित केलेल्या गौरी सजावट स्पर्धा २०१९ चा बक्षीस वितरण समारंभ गुरुवार दि. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता यशवंतराव चव्हाण हायस्कुल, फलटण येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती निमंत्रक सौ. ज्योती सचिन सुर्यवंशी (बेडके) यांनी दिली आहे.
आर्यमान फाऊंडेशन याच्यावतीने आयोजित केलेल्या उपक्रमास शहरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यापुढेही महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येणार असून फलटण शहर व परिसरातील महिलांनी यामध्ये सहभागी होऊन उत्साह वाढवावा असे आवाहन सौ. ज्योती सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी केले आहे.
यानिमित्ताने आर्यमान फाऊंडेशन यांचेवतीने महाभोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महिलांनी सहभागी व्हावे असे सांगण्यात आले.
आर्यमान फाऊंडेशन यांचेवतीने बक्षीस वितरण व महाभोंडला उपक्रमास महिला यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आर्यमान फाऊंडेशनचे पदाधिकारी यांनी केले आहे.