जगाला अहिंसेचा संदेश देणाय्रा महात्मा गांधीजींचे विचार विद्यार्थ्यांनी आचरणात आणावेत : प्रा. मोरे सर

जगाला अहिंसेचा संदेश देणाय्रा महात्मा गांधीजींचे विचार विद्यार्थ्यांनी आचरणात 

फलटण : दि.2/10/19 मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे विविध उपक्रम राबवून महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली,या निमित्ताने महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागामार्फतही या दोन महापुरूषांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना प्रा.रणधीर मोरे सर यांनी वरील मत व्यक्त केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, आज संपूर्ण भारतभर महात्मा गांधींजी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी केली जाते त्याचे कारण म्हणजे त्यांनी जगाला दिलेली तत्वे.
सत्य, अहिंसा हि तत्वे तर पुर्वीपेक्षा आधुनिक काळात ज्यास्त आवश्यक आहेत,अत्यंत हिंसक विचारांच्या हुकूमशहांमुळे जग आज तिसय्रा महायुद्धाच्या खायीत लोटले जावू शकते व त्याचे दुष्परिणाम नेमके काय होतील व ते किती वर्षे राहतील हे सांगणे कठीण आहे. या सर्व दुष्परिणामांपासुन स्वता:ला व जगाला  वाचवायचे असेल तर सर्वांनी गांधीजींच्या अहिंसेचे  विचार आत्मसात करून ते विचार आपल्या आचरणात आणले पाहिजेत तसेच लालबहाद्दूर शास्त्री यांचे कष्ट करण्याची तयारी, प्रामाणिकपणा यासारखे गुण आत्मसात करून जीवनात यशस्वी होऊन आपला नावलौकिक वाढविण्याचे आवाहन प्रा.मोरे सर यांनी विद्यार्थ्यांना केले. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.पाडवीसर यांनी केले त्यावेळी बोलताना त्यांनी या दोघांची अत्यंत मौलिक माहिती विद्यार्थ्यांना दिली.तसेच या वेळी प्रा.शेंडगे मँडम व राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाला प्रा. मोरे सर, प्रा.पाडवी सर , प्रा.शेंडगे मँडम, प्रा. मदणे सर व राज्यशास्त्र विषयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!